
टेक्नो कंपनीने नुकताच टेक्नो स्पार्क 10 प्रो स्मार्टफोन लाँच केला आहे. हा फोन सेल्फी लवर्ससाठी एकदम बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने हा स्मार्टफोन आपल्या वेबसाईटवर लिस्ट केला आहे. या स्मार्टफोनमधील इतर फीचर्स पाहून तुम्हीही खूश व्हाल. (Photo- Tecno)

या स्मार्टफोनमध्ये 30 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह 6.8 इंचाची एलसीडी डिस्प्ले आहे. यामुळे फुल एचडी प्लस रिझॉल्युशन मिळतं. फोन अँड्रॉईड 13 वर आधारित असून आयओएस 12.6 वर काम करतो. (Photo- Tecno)

स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी टेक्नो स्पार्क 10 प्रो मध्ये मीडियाटेक हीलियो जी88 ऑक्टा कोर प्रोसेसरसह ग्राफिक्ससाठी पुरक जीपीयू देण्यात आलं आहे. (Photo- Tecno)

फोनच्या मागच्या बाजूला दोन कॅमेऱ्यासह एलईडी फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. 50 एमपी प्रायमरी कॅमेरासह एआय लेंस दिलं आहे. 18 वॅट फास्ट चार्जिंगसह 5000 एमएएचच्या बॅटरीसह येतो. (Photo- Tecno)

टेक्नो स्मार्टफोन दोन व्हेरियंटसह येतो. पहिल्या स्मार्टफोनमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेजसह आहे. दुसरा, 8 जीबी रॅमसह 256 जीबी स्टोरेजसह येतो.पण या दोन्ही मॉडेल्सची किंमत अजून जाहीर केलेली नाही. या हँडसेटची किंमत 10 हजार रुपयांपासून सुरु होते. (Photo- Tecno)