‘या’ फोनची किंमत 9 हजार 99 रुपयांनी झाली कमी, कॅमेरा आणि प्रोसेसर सर्वच आहेत दमदार

तुम्हाला जर फ्लॅगशिप फोन आणि त्यावर बंपर डिस्काउंट हवा असेल, तर तुम्ही हा गुगल पिक्सेल फोन 9 हजार 99 रूपयांच्या डिस्काउंटसह खरेदी करू शकता. चला तर मग आजच्या लेखात आपण हा फोन डिस्काउंटनंतर कोणत्या किंमतीला विकला जात आहे ते जाणून घेऊयात.

या फोनची किंमत 9 हजार 99 रुपयांनी झाली कमी, कॅमेरा आणि प्रोसेसर सर्वच आहेत दमदार
Pixel 10
Image Credit source: TV9 Bharatvarsh
| Edited By: | Updated on: Jan 31, 2026 | 5:54 AM

तुम्हाला जर गुगलचा नवीनतम फ्लॅगशिप स्मार्टफोन असलेला पिक्सेल 10 आवडत असेल, परंतु किंमतीकडे पाहून खरेदी करता येत नाहीये, तर आता चिंता करू नका कारण तुम्हाला आवडत असलेल्या गुगल पिक्सेल 10 या फोनवर उत्तम डिल उपलब्ध आहे. तर या फोनची किंमत 9 हजार 99 रूपयांनी कमी झाली आहे. त्यामुळे या फोनची किंमत अधिकच स्वस्त झालीये. स्वच्छ अँड्रॉइड अनुभव, उत्कृष्ट कॅमेरा क्षमता आणि प्रगत एआय-पावर्ड वैशिष्ट्ये देणाऱ्या या फोनवर लक्षणीय सूट दिली जात आहे. चला लॉन्च किंमत आणि तुम्हाला आत्ता कोणत्या किंमतीत हा फोन मिळू शकतो याबद्दल आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

गुगल पिक्सेल 10 ची भारतात किंमत

हा पिक्सेल स्मार्टफोन भारतात 79 हजार 999 रूपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. सध्या हा फोन Amazon वर 70 हजार 900 रूपयांमध्ये उपलब्ध आहे, ज्यावर 9 हजार 99 रूपयांची सूट आहे. अॅक्सिस बँक आणि HDFC बँक कार्ड वापरून केलेल्या पेमेंटवर 1 हजार 500 रूपयांपर्यंत सूट देखील देण्यात येत आहे. त्यामुळे तुम्हाला हा फोन आणखीन स्वस्तात खरेदी करता येणार आहे. हा पिक्सेल फोन S25 आणि OnePlus 13 सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करतो.

गुगल पिक्सेल 10 स्पेसिफिकेशन

या पिक्सेल फोनमध्ये टेन्सर G5 प्रोसेसर 12 जीबी पर्यंत रॅम आणि 256 जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. 4970एमएएच बॅटरीद्वारे समर्थित, हे 30 वॅट फास्ट वायर्ड चार्जिंग आणि 15 वॅट पर्यंत वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

डिस्प्लेच्या बाबतीत या हँडसेटमध्ये 6.3-इंचाची ओएलईडी स्क्रीन आहे ज्यामध्ये 3000निट्स पीक ब्राइटनेस आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 वापरला जातो.

कॅमेरा सेटअपच्या बाबतीत बोलायचे झाले तर फोनच्या मागील बाजूस 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा सेन्सर आणि 5x ऑप्टिकल झूमसह 10.8 मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी, 10.5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

टीप: हे सर्व फ्लॅगशिप स्मार्टफोन आहेत, म्हणून कृपया कोणताही फोन निवडण्यापूर्वी फिडबॅक वाचा, कारण आम्ही कोणत्याही खरेदीची शिफारस करत नाही आहोत. ही बातमी फक्त माहितीच्या उद्देशाने आहे.