Google Play Store : ‘गुगल प्ले स्टोअर’ मध्ये आलाय ‘स्पेशल प्रायव्हसी टूल’, कोणता डेटा कुठे वापरला जातो हे अ‍ॅप सांगेल!

| Updated on: Apr 27, 2022 | 2:41 PM

गुगलने आपले नवीन प्ले स्टोअर लाँच केले आहे. जाणून घ्या काय होईल फायदा.

Google Play Store : ‘गुगल प्ले स्टोअर’ मध्ये आलाय ‘स्पेशल प्रायव्हसी टूल’, कोणता डेटा कुठे वापरला जातो हे अ‍ॅप सांगेल!
गुगल प्ले स्टोअर
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : आता Android 12 युजर्स Android प्रायव्हसी डॅशबोर्डच्या मदतीने युजर्संच्या डेटा एन्ट्रीचे रीजरलेझायशेन करू शकतात. म्हणजेच यामध्ये यूजर्स कोणते अ‍ॅप कोणते फीचर्स ऍक्सेस करत आहे हे पाहू शकतात. Google ने सर्व अ‍ॅप डेव्हलपरर्सना (To app developers) 20 जुलै 2022 पर्यंत डेटा सुरक्षा विभाग पूर्ण करण्यास सांगितले आहे. ज्या अ‍ॅप्ससाठी तुम्हाला डेटा सुरक्षा विभाग (Department of Data Security) सध्या दिसत नाही ते येत्या काही आठवड्यांमध्ये दिसायला लागतील. डेटा सेफ्टी फीचर आजपासून गुगल प्ले स्टोअरसाठी आणण्यात आले आहे. Apple च्या Privacy Nutrition लेबल प्रमाणे, Google ने देखील हे डेटा सुरक्षा वैशिष्ट्य Android उपकरणांसाठी जारी केले आहे. यामध्ये आता प्ले स्टोअरवर कोणता अ‍ॅप डेव्हलपर यूजरची कोणती वैयक्तिक माहिती (Personal information) संकलित करत आहे हे पाहता येईल.

गुगलने अ‍ॅप डेव्हलपर्सना असेही निर्देश दिले आहेत की अ‍ॅपच्या फंक्शनमध्ये काही बदल झाल्यास ते डेटा सेफ्टी सेक्शनमध्ये अपडेट करावे लागेल, जेणेकरून यूजर्स अ‍ॅपमधील बदलांबद्दल जाणून घेऊ शकतील.

Google चा नवीन डेटा सेफ्टी फीचर्स काय आहे?

Google चा डेटा सुरक्षा विभाग युजर्सला सांगेल की-

  1. डेव्हलपर कोणत्या उद्देशाने त्यांच्याकडून कोणता डेटा घेत आहेत?
  2. डेव्हलपर युजर्स डेटा कोणत्याही तृतीय पक्षासह सामायिक करत आहेत का?
  3. अ‍ॅपची सुरक्षा माहिती म्हणजेच डेटा पाठवण्यासाठी एन्क्रिप्शनचा वापर केला जातो का?
  4. युजर्स त्यांचा वैयक्तिक डेटा हटवण्यास सांगू शकतात?
  5. Google Play Store वरील अ‍ॅप्स Google च्या सुरक्षा धोरणास पात्र आहेत की नाही?
  6. डेव्हलपरने अ‍ॅपच्या सुरक्षा पद्धती जागतिक रेंजनुसार ठेवल्या आहेत का?

गुगल काय म्हणाले?

गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की, “युजर्संना हे जाणून घ्यायचे आहे की त्यांचा डेटा कोणत्या उद्देशाने संकलित केला जात आहे आणि डेव्हलपर युजर्सचा डेटा तृतीय पक्षांसोबत शेअर करत आहेत का? याशिवाय, युजर्संना हे देखील समजून घ्यायचे आहे की एकदा अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर अ‍ॅप डेव्हलपर युजर्संचा डेटा कसा सुरक्षित करत आहेत. म्हणूनच आम्ही डेटा संरक्षण विभाग डिझाइन केला आहे जेणेकरून डेव्हलपर स्पष्टपणे सांगू शकतील की कोणता डेटा गोळा केला जात आहे आणि कोणत्या उद्देशांसाठी?” आत्तापर्यंत, अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर, तो कॅमेरा ऍक्सेस, लोकेश ऍक्सेस किंवा मायक्रोफोन ऍक्सेस यासारख्या निवडक वैशिष्ट्यांचा ऍक्सेस मागतो, त्यानंतर युजर्संना अ‍ॅप वापरताना आणि नेहमी या पर्यायांवर क्लिक करावे लागते. आता, युजर्सच्या सेफ्टीच्या दृष्टीने काळजी घेतली जाणार आहे.