
रिल्स आणि व्हिडीओ बनवण्याचा शौक असणाऱ्यांसाठी एक शानदार सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन बाजारात आला आहे. Vivo Y400 Pro फोन अशा लोकांसाठी एक चांगला पर्याय असू शकतो. या फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आणि 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा असणार आहे. फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 256 जीबीच्या इंटर्नल स्टोरेजवाल्या व्हेरिएंटची किंमत Amazon इंडियावर 27,999 रुपयांत मिळत आहे.
खास बाब म्हणजे हा फोन जर तुम्ही 31 जानेवारीच्या आत विकत घेतला तर तुम्हाला हा फोन 2 हजार रुपयांच्या बँक डिस्काऊंट सह मिळू शकतो. या फोनवर कंपनी 1399 रुपयांचा कॅशऑफर देखील देत आहे. एक्स्चेंज ऑफरमध्ये हा फोन 26550 रुपयांपर्यंत स्वस्त मिळू शकतो.मात्र, तुमच्या जुन्या स्मार्टफोनची कंडीशन, ब्रँड आणि कंपनीची एक्स्चेंज पॉलीसीवर ही ऑफर अवलंबून असेल असे कंपनीने म्हटले आहे.
कंपनीने Y400 प्रोमध्ये 6.77 इंचाचा फूल एचडी + AMOLED display देत आहे. या फोनमध्ये दिलेल्या या ऑफर केलेला डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यातील डिस्प्लेचा पिक ब्रायटनेस लेव्हल 4500 निट्स आहे. फोनमध्ये 8 जीबी LPDDR4X रॅम आणि 256 जीबीचा UFS 2.2 स्टोरेज ऑप्शन मध्ये मिळत आहे. या फोनमध्ये डायमेंसिटी 7300 चिपसेट देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह ड्युएल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
या फोनमध्ये 50 मेगा पिक्सेलच्या प्रायमरी सेंसरसह एक 2 मेगा पिक्सेलचा डेप्थ सेंसर देखील सामील आहे. फोनचा मुख्य कॅमेरा OIS यानी ऑप्टीकल इमेज स्टेबिलायझेशन फिचर्स येतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 32 मेगा पिक्सेलचा फ्रंट कॅमरा देण्यात आला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी यात 5500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या फोन बॅटरी 90 वॅटच्या फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या चार्जिंग टेक्नॉलॉजीने या फोनची बॅटरी केवळ 19 मिनिटात 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होते.
ओएस म्हणजे या फोनची ऑपरेशन सिस्टीम एड्रॉईंड 15 वर बेस्ड Funtouch OS15 वर काम करते. बायोमेट्रिक सिक्युरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. हा फोन तीन कलरचा पर्यायात मिळत आहे. फ्रीस्टाईल व्हाईट, फेस्ट गोल्ड आणि नेब्युला पर्पल अशा तीन कलरमध्ये येत आहे.