200 मेगापिक्सेल कॅमेरे असलेले ‘हे’ 5 अद्भुत स्मार्टफोन, फोटो आणि व्हिडिओसाठी आहेत सर्वोत्तम पर्याय

तुम्ही जर 200 एमपी कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनचा विचार करत असाल तर बाजारात अनेक फोन उपलब्ध आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण अशा 5 टॉप स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊयात जे फोटोग्राफीसाठी उत्तम पर्याय आहेत.

200 मेगापिक्सेल कॅमेरे असलेले हे 5 अद्भुत स्मार्टफोन, फोटो आणि व्हिडिओसाठी आहेत सर्वोत्तम पर्याय
| Edited By: | Updated on: Feb 07, 2026 | 3:52 PM

भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनमध्ये असलेल्या कॅमेऱ्यांची शर्यत एका नवीन पातळीवर पोहोचली आहे आणि 200 मेगापिक्सेल कॅमेरे असलेले फोन वेगाने लोकप्रिय होत आहेत. 2026 मध्ये, डीएसएलआर सारखे असलेले फिचर, उत्कृष्ट रात्रीचे फोटोग्राफी आणि प्रो-लेव्हल व्हिडिओ रेकॉर्डिंग देणारे अनेक स्मार्टफोन मॉडेल उपलब्ध आहेत. 200 मेगापिक्सेल सेन्सर आता प्रीमियम आणि मध्यम श्रेणीच्या सेगमेंटमध्ये देखील उपलब्ध आहेत. जर तुम्ही नवीन कॅमेरा-फोकस असलेला फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्या लेखात आपण 200 मेगापिक्सेल सेन्सर असलेले पाच स्मार्टफोन बद्दल जाणून घेऊयात.

सॅमसंग गॅलेक्सी एस25 अल्ट्रा

हा फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये कॅमेऱ्यांचा पॉवरहाऊस मानला जातो. यात 200 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर OISसह आहे, जो 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि दोन टेलिफोटो लेन्ससह येतो. हा फोन 3x आणि 5x ऑप्टिकल झूमसह स्पष्ट लांब एखाद्या वस्तुचा फोटो कॅप्चर करू शकतो. 8के व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि ॲडव्हांस स्टेबलाइजेशन यामुळे हा फोन कंटेंट क्रिएटर्ससाठी एक चांगला पर्याय बनतो. यात 12 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे आणि भारतात या फोनची किंमत सुमारे 1 लाख 29 हजार 999 रुपये आहे.

Vivo X300

Vivo X300 हा एक पॉवरफूल कॅमेरा असलेला फोन आहे. यात ZEISS ऑप्टिक्स आणि OIS सपोर्टसह 200MP चा मुख्य कॅमेरा आहे. 50MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा-वाइड लेन्स देखील देण्यात आला आहे, जो पोर्ट्रेट आणि झूम शॉट्स वाढवतो. लेसर ऑटोफोकस आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे हा एक ऑल-अराउंड कॅमेरा फोन बनतो. हाय-डेटेल सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर या स्मार्टफोनची किंमत सुमारे 75 हजार 999 रूपये आहे.

रेडमी नोट 15 प्रो 5 जी

जर तुमचे बजेट कमी असेल, तर हा रेडमी फोन सर्वोत्तम पर्याय आहे. यात 200 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा OIS सह आणि 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आहे. तर हा फोन 4के व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतो. 20 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दैनंदिन वापरासाठी आणि सोशल मीडियासाठी पुरेसा आहे. भारतात त्याची किंमत सुमारे 30 हजार रुपये आहे.

vivo V60e

जर तुम्हाला कमी किमतीत Vivo चा पॉवरफूल कॅमेरा फोन वापरायचा असेल, तर हा फोन तुमच्यासाठी आहे. vivo V60e मध्ये 200MP कॅमेरा आहे आणि तो OIS ला सपोर्ट करतो. यात 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि AI-आधारित इमेज फीचर्स आहेत. कंपनीचा दावा आहे की 30x सुपर झूम आणि सुधारित 4K व्हिडिओ आउटपुट. 50MP आय ऑटोफोकस फ्रंट कॅमेरा सेल्फी आणि व्लॉगिंगसाठी उत्कृष्ट आहे. तर या फोनच्या 256GB व्हेरिएंटची किंमत 33 हजार 999 रूपये आहे.

Realme 16 Pro 5G

हा फोन मध्यम श्रेणीत असलेला तुमचा सर्वोत्तम पर्याय असू शकतो. यात OIS सह 200MP चा मुख्य कॅमेरा आहे, जो उच्च-रिझोल्यूशन फोटोग्राफीसाठी आदर्श आहे. फोनमध्ये उच्च-डिटेल सेल्फीसाठी 50MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे. यात 6.78-इंच 144Hz 1.5K AMOLED डिस्प्ले आणि डायमेन्सिटी 7300-मॅक्स चिपसेट आहे. त्याची 7000mAh बॅटरी आणि 80W जलद चार्जिंग पॉवर वापरकर्त्यांसाठी एकदम खास ठरेल. तर या फोनची किंमत 31 हजार 999 रूपये आहे.