
ॲपल कंपनीने भारतात त्यांचा मॅकबुक निओ हा लॅपटॉप 69 हजार 999 रूपयांपासून सह निश्चितपणे बजेट सेगमेंटमध्ये प्रवेश सादर केला आहे. मात्र या रेंजच्या हिशोबाने भारतीय बाजारात असे अनेक कंपनीचे लॅपटॉप उपलब्ध आहेत जे कमी किमतीत अधिक फिचर्स देतात. मॅकबुक निओमध्ये मर्यादित रॅम, स्टोरेज आणि लहान डिस्प्ले यांसारखे फिचर्स आहे. पण इतर ब्रँड्स अधिक पॉवरफूल वैशिष्ट्यांसह उत्तम पर्याय देतात. विशेष म्हणजे हे सर्व लॅपटॉप जवळपास सारख्याच किंवा त्याहून कमी किमतीत उपलब्ध आहेत. जर तुम्ही नवीन लॅपटॉप घेण्याचा विचार करत असाल, तर या पर्यायांकडे दुर्लक्ष करू नका. चला तर मग आजच्या लेखात आपण अशाच पाच लॅपटॉपबद्दल जाणून घेऊयात.
लेनोवो आयडियापॅड स्लिम सुमारे 60,000 ते 70,000 हजार रूपयांमध्ये उपलब्ध आहे आणि त्यात इंटेल कोर 5 210H प्रोसेसर आहे. यात मोठा 15.3-इंचाचा डिस्प्ले आहे. हा लॅपटॉप 16GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह येतो, सोबतच यात एक मायक्रोएसडी स्लॉट देखील आहे. हा विंडोज-आधारित लॅपटॉप मल्टीटास्किंग आणि मोठ्या स्क्रीनसाठी डिझाइन केलेला आहे.
एसर एस्पायर 16 एआयची किंमत अंदाजे 55,000 ते 65,000 हजार रूपये आहे आणि हा लॅपटॉप क्वालकॉम स्नॅपड्रॅगन एक्स प्रोसेसरवर चालतो. यात 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज आहे. या लॅपटॉपमध्ये 1920×1200 रिझोल्यूशन असलेला 16-इंचाचा आयपीएस टच डिस्प्ले आहे आणि तो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात 65Wh क्षमतेची बॅटरी आहे, जी सामान्य वापरात 21 तासांपर्यंत टिकते असे म्हटले जाते. हे डिव्हाइस लोकल एआय कार्यांसाठी डिझाइन केलेले आहे आणि विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर चालते.
एचपी व्हिक्टस15.6 -इंच गेमिंग लॅपटॉपची सुरुवातीची किंमत सुमारे 52 हजार रूपये आहे. यामध्ये AMD Ryzen 5 7535HS प्रोसेसर आणि Nvidia RTX 2050 GPU देण्यात आलेला आहे. हे कॉम्बिनेशन 1080पी गेमिंगसाठी उत्कृष्ट आहे. या लॅपटॉपमध्ये 144 हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करणारा 15.4-इंच एफएचडी अँटी-ग्लेअर डिस्प्ले आहे. यात 512जीबी स्टोरेज आणि एक एसडी कार्ड स्लॉट देखील मिळतो. हा लॅपटॉप उच्च ग्राफिक्स आणि गेमिंगच्या गरजांसाठी डिझाइन केलेला आहे.
सॅमसंग गॅलेक्सी बुक 4 ची किंमत सुमारे 62 हजार रुपये असून, हा लॅपटॉप Intel Core 7 150U प्रोसेसरवर चालतो. यात 16 जीबी रॅम आणि 512 जीबी वाढवता येण्याजोगे स्टोरेज आहे. या लॅपटॉपमध्ये 15.6-इंचाचा फुल एचडी आयपीएस डिस्प्ले आहे. यात फुल-साईझ कीबोर्ड, नंबर पॅड, फिंगरप्रिंट सेन्सर आणि इथरनेट पोर्टचा समावेश आहे. हा विंडोज 11 वर चालतो आणि विविध स्क्रीन साईझच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.