Smartphone | 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज असलेले हे आहेत 5 स्वस्त स्मार्टफोन

स्मार्टफोनचा वापर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यात ऑनलाईन क्लासेस आणि वर्क फ्रॉम होममुळे अनेक घरांतील स्मार्टफोनची संख्या वाढली आहे. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन, गेल्या वर्षभरात स्मार्टफोन कंपन्यांनी देखील आपल्या मोबाईल्समध्ये कमी कीमतीत अधिक फीचर्सची सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. 

Smartphone | 8GB पर्यंत RAM आणि 128GB स्टोरेज असलेले हे आहेत 5 स्वस्त स्मार्टफोन
8 GB सह टॉप 5 स्मार्टफोन्सImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Apr 08, 2022 | 3:14 PM

सध्या भारतीय बाजारपेठेत आजकाल मस्त फीचर्स असलेले स्मार्टफोन अनेक आहेत. बजेट रेंज व्यतिरिक्त, प्रीमियम रेंज देखील सर्वोत्तम फोन्सपैकी एक आहे. फोन खरेदी करताना ग्राहक कॅमेरा सेटअपकडे जास्त लक्ष देतात. तुम्हाला 108MP चा फोन कमी किमतीत घ्यायचा असेल तर हा लेख नक्की वाचा. 108MP कॅमेरा आणि 8GB पर्यंत RAM असलेले सर्वात स्वस्त फोन येथे आहेत. या यादीमध्ये Redmi Note 11 Pro, OPPO A96, Vivo T1 5G, Realme 8 आणि Poco M4 Pro 4G ची नावे समाविष्ट आहेत. कॅमेरा आणि रॅम व्यतिरिक्त त्यांना अनेक चांगले स्पेसिफिकेशन्स देखील मिळतात. फोनचे तपशील आणि किंमत जाणून घेण्यासाठी खाली वाचा. 8 जीबी रॅम असलेल्या स्मार्टफोनमध्ये गेमिंग आणि मल्टी-टास्किंगचा अनुभवही उत्तम आहे. चला तर मग जाणून घेऊया या वर्षी लॉन्च झालेल्या वीस हजारांपेक्षा कमी कींमत असलेल्या 8 GB सह टॉप 5 स्मार्टफोन्सबद्दल.

  •  Redmi Note 11 Pro : या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज उपलब्ध आहे, ज्याची किंमत 19999 रुपये आहे. तसेच, या फोनमध्ये 120Hz चा रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे. यात 5000 mAh बॅटरी आहे, जी 67W फास्ट चार्जर आहे. तसेच, मागील पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 108 मेगापिक्सेल आहे. सेल्फीसाठी 16-मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आला आहे.
  •  OPPO A96 : Oppo चा Oppo A96 स्मार्टफोन 8 GB रॅमसह उपलब्ध आहे, ज्याची किंमत 19999 रुपये आहे. यात 128 GB पर्यंत अंतर्गत स्टोरेज आहे. तसेच, यात मागील बाजूस पंच होल कटआउट आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा बसवण्यात आला आहे. यात 6.59 इंचाचा फुल एचडी प्लस डिस्प्ले आहे. याच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 50 मेगापिक्सेल आहे. तसेच यामध्ये 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट वापरण्यात आला आहे.
  •  Vivo T1 5G : Bivo च्या या नवीनतम स्मार्टफोनमध्ये 8 GB RAM उपलब्ध आहे आणि त्याची किंमत 1,990 रुपये आहे. हा 5G स्मार्टफोन असून यामध्ये स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट वापरण्यात आला आहे. कंपनीने यामध्ये टर्बो कूलिंगची प्रणाली दिली आहे, जी गेमिंग आणि मल्टी टास्किंग दरम्यान मोबाइलचे तापमान नियंत्रित करू शकते. याच्या मागील पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा देण्यात आला आहे.
  •  Realme 8 : 8 GB RAM सह येणाऱ्या या फोनची किंमत 180999 रुपये आहे. यामध्ये यूजर्स 128 GB इंटरनल स्टोरेज आणि 256 GB पर्यंत SD कार्ड ठेवू शकतात. तसेच, मागील पॅनलवर क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा 64 मेगापिक्सेल आहे. 16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात 5000 mAh बॅटरी आहे.
  •  Poco M4 Pro 4G : Poco चा हा मोबाईल फोन 18999 रुपयांना येतो. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. तसेच, ते 1 TB पर्यंत SD कार्डला सपोर्ट करते. याच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सेलचा प्राथमिक कॅमेरा आहे. हा मोबाइल फोन 16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह येतो. तसेच मीडियाटेक डायमेंशन 810 चिपसेट देण्यात आली आहे.
Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.