स्वस्तात मस्त.. जिओ आणि एअरटेलचे हे रिचार्ज प्लान्स पाहिलेत का ?

तुम्ही जर जिओ आणि एअरटेल दोन्हीचे सिम कार्ड वापरत असाल, तर तुम्हाला माहित असले पाहिजे की कोणत्या कंपनीकडे 28 दिवसांची वैधता असलेला सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन आहे. आजच्या लेखात आपण दोन्ही कंपन्यांच्या प्लॅनच्या किंमती आणि फायद्यांबद्दल जाणून घेऊयात.

स्वस्तात मस्त.. जिओ आणि एअरटेलचे हे रिचार्ज प्लान्स पाहिलेत का ?
हे रीचार्ज प्लान्स माहिती पाहिजेतच
| Edited By: | Updated on: Dec 05, 2025 | 4:13 PM

जर तुम्ही रिलायन्स जिओ आणि एअरटेल सिम कार्ड असलेला ड्युअल सिम फोन वापरत असाल तर रिचार्ज करण्यापूर्वी तुम्हाला हे माहित असले पाहिजे की या दोन कंपनीकडे 28 दिवसांच्या वैधतेसह सर्वात स्वस्त कोणता रिचार्ज प्लॅन आहे. आजच्या लेखात आपण दोन्ही कंपन्यांच्या सर्वात स्वस्त 28 दिवसांच्या प्लॅनची ​​किंमत आणि फायदे यांच्यातील फरक जाणून घेणार आहोत. त्यामुळे रिचार्ज करण्यापूर्वी तुम्हाला योग्य माहिती मिळू शकेल आणि तुमच्यासाठी योग्य प्लॅन निवडू शकाल. त्यासोबतच स्वस्त रिचार्ज प्लॅनचा फायदा ही घेऊ शकाल.

जिओचा 189 रूपयांच्या प्लॅनची ​​माहिती

जिओच्या 189 रुपयांच्या प्लॅनमध्ये जिओ प्रीपेड वापरकर्त्यांना 2 जीबी हाय-स्पीड डेटा देते. डेटा संपल्यानंतर स्पीड लिमिट 64 केबीपीएस पर्यंत कमी केली जाईल. डेटा व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस सेवा देखील मिळतील.

जिओच्या 189 रूपयांच्या प्लॅनची ​​वैधता

189 रुपयांच्या जिओ प्लॅनची ​​वैधता 28 दिवस आहे. अतिरिक्त फायद्यांमध्ये जिओ टीव्ही आणि जिओ एआय क्लाउडचा समावेश आहे.

एअरटेलच्या 199 रूपयांच्या प्लॅनची ​​माहिती

एअरटेलचा 28 दिवसांच्या वैधतेचा सर्वात स्वस्त प्लॅन रिलायन्स जिओपेक्षा 10 रुपयांनी महाग आहे. जर तुम्ही एअरटेल प्रीपेड वापरकर्ता असाल तर तुम्हाला 189 रुपयांऐवजी 199 रुपये खर्च करावे लागतील. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी हाय-स्पीड डेटा, मोफत कॉलिंग आणि 100 एसएमएस सुविधा मिळतात. 10 रुपये जास्त खर्च केल्याने अधिक एसएमएसचा फायदा देखील मिळतो. जिओ फक्त 300 एसएमएस देते, तर एअरटेलचा प्लॅन दररोज 100 एसएमएस देतो.

एअरटेल 199 प्लॅनची ​​वैधता

199 रुपयांच्या एअरटेल प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता देखील आहे. अतिरिक्त फायद्यांसाठी 10 रुपये अतिरिक्त खर्च केल्याने तुम्हाला केवळ अधिक एसएमएसच मिळत नाहीत तर स्पॅम अलर्ट, मोफत हॅलोट्यून्स आणि पर्प्लेक्सिटी प्रो एआय देखील मिळतात.