AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रेल्वेचं कन्फर्म टिकीट मिळवण्यासाठी या युक्त्या येतील कामी, अनेकांसाठी नवीन आहे ही माहिती

आधी तत्काळ तिकीट बुकिंगची खिडकी उघडताच  एजंट ही तिकिटे बुक करायचे, मात्र आता नियम बदलले आहेत. आता जर तुम्हाला ट्रेनचे तिकीट ताबडतोब बुक करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील

रेल्वेचं कन्फर्म टिकीट मिळवण्यासाठी या युक्त्या येतील कामी, अनेकांसाठी नवीन आहे ही माहिती
कल्याण रेल्वे स्थानकात दलालाकडून प्रवाशाला मारहाणImage Credit source: Social Media
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: May 06, 2023 | 7:43 PM
Share

मुंबई : काही वेळा कन्फर्म ट्रेन तिकीट बुक करणे खूप कठीण होऊन बसते. सध्या डिजीटलायझेशन झाल्यामुळे रेल्वे तिकीट कन्फर्म (Tips for Conform railway Ticket) करण्यासाठी पूर्वीसारखे भटकावे लागत नाही. आधी तत्काळ तिकीट बुकिंगची खिडकी उघडताच  एजंट ही तिकिटे बुक करायचे, मात्र आता नियम बदलले आहेत. आता जर तुम्हाला ट्रेनचे तिकीट ताबडतोब बुक करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स फॉलो कराव्या लागतील,  चला तर मग जाणून घेऊया या ट्रिक्स कोणत्या आहेत आणि त्याद्वारे तुमचे कन्फर्म ट्रेन तिकीट कसे बुक करता येईल.

हाय स्पीड इंटरनेट वापरा

तुम्ही जलद इंटरनेट स्पीडने तिकीट बुक केल्यास, तुम्हाला तत्काळ ट्रेनची कन्फर्म तिकिटे मिळण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही तिकीट बुक करताना स्लो इंटरनेट कनेक्शन वापरत असाल, तर अनेक वेळा प्रक्रिया मध्यभागी लटकते आणि तुम्ही तिकीट बुक करू शकत नाही. अशा परिस्थितीत, तुम्ही नेहमी हाय स्पीड इंटरनेट कनेक्शन वापरावे, यामुळे तुम्हाला रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळू शकते.

IRCTC वर लॉग इन करणे आवश्यक आहे

जर तुम्हाला कन्फर्म ट्रेन तिकीट हवे असेल तर तुम्ही IRCTC च्या वेबसाईटवर म्हणजेच इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनवर लॉग इन करून आयडी आणि पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे. येथून तुम्ही कन्फर्म केलेले रेल्वे तिकीट सहजपणे बुक करू शकता आणि तुमच्या गंतव्यस्थानी सहज पोहोचू शकता. असे केल्याने तुम्हाला ट्रेनचे तिकीट बुक करायला जास्त वेळ लागणार नाही.

थर्ड पार्टी अॅप्स वापरा

कन्फर्म ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्ससुद्धा चांगला पर्याय आहे. याचा वापर करून तुम्ही रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त Google Play Store वर जावे लागेल, त्यानंतर तुम्हाला चांगले रेटिंग असलेले थर्ड पार्टी अॅप डाउनलोड करावे लागेल, यामुळे तुमचे कन्फर्म ट्रेन तिकीट मिळण्याची शक्यता वाढेल. ही पद्धत खूप प्रभावी आहे आणि त्याचा तुम्हाला खूप उपयोग होऊ शकतो.

Follow Us
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन