Realme चा धमाकेदार बॅटरीसह लाँच झालेला हा स्वस्त फोन, Redmi-Poco ला देईल टक्कर

Realme P4 Lite भारतात लाँच झाला आहे. हा फोन 6300mAh क्षमतेच्या पॉवरफूल बॅटरीसह येतो. चला तर मग या फोनची किंमत, वैशिष्ट्ये, ऑफर्स आणि उपलब्धतेबद्दल जाणून घेऊयात.

Realme चा धमाकेदार बॅटरीसह लाँच झालेला हा स्वस्त फोन, Redmi-Poco ला देईल टक्कर
realme
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 21, 2026 | 6:56 PM

रिअलमी कंपनीने त्यांचा Realme P4 Lite हा फोन ग्राहकांसाठी लाँच केला आहे. कंपनीच्या P4 सिरीजमधील या नवीनतम फोनमध्ये अनेक उत्तम फिचर्स देण्यात आले आहेत. मुख्य आकर्षण म्हणजे त्याची पॉवरफूल 6300 mAh बॅटरी. तर तुम्ही रिअलमीचा हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असला तर आजच्या लेखात आपण या फोनसाठी तुम्हाला किती पैसे मोजावे लागतील, तो कधी विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि त्यात इतर कोणते खास फीचर्स आहेत ते जाणून घेऊयात.

Realme P4 Lite ची भारतातील किंमत

या Realme स्मार्टफोनच्या बेस व्हेरिएंटची किंमत 9 हजार 999 आहे, ज्यामध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे. याच्या टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 11 हजार 999 रूपये आहे. या फोनसोबत तुम्हाला 1 हजार रूपयांचा बँक डिस्काउंट किंवा 1 हजार रूपयांचा कूपन डिस्काउंटचाही फायदा मिळेल.

उपलब्धतेच्या बाबतीत बोलायचे झाले तर हा फोन 24 फेब्रुवारीपासून कंपनीच्या वेबसाइट व्यतिरिक्त फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. या किंमत रेंजमध्ये तो Redmi Note 14 SE 5G, POCO M7 5G, realme P3 Lite 5G आणि Samsung Galaxy F70e 5G सारख्या स्मार्टफोनशी स्पर्धा करतो.

Realme P4 Lite चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले: या फोनमध्ये 6.74-इंचाचा एचडी+ रिझोल्यूशन डिस्प्ले आहे जो 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट सपोर्टसह येतो. हा फोन 180 हर्ट्झ पर्यंत टच सॅम्पलिंग रेट आणि 563 निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह उपलब्ध असेल.

चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी, या हँडसेटमध्ये ऑक्टा कोर युनिसॉक टी7250 प्रोसेसर देण्यात आला आहे, तसेच ग्राफिक्ससाठी माली जी57एमपी1 जीपीयू वापरण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअप: फोनच्या मागील बाजूस 13-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी, समोर 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा सेन्सर आहे.

कंपनीचा दावा आहे की फोन 30fps वर 1080p रिझोल्यूशनवर व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सक्षम आहे.

बॅटरी: 15 वॅट वायर्ड चार्जिंग सपोर्टसह पॉवरफूल 6300 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.

कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये GPS, Wi-Fi, 4G LTE, ब्लूटूथ आवृत्ती 5.2 आणि GLONASS आहे. सुरक्षेसाठी, बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर आहे.