AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि दमदार बॅटरीचा हा फोन स्वस्तात मिळतोय , जाणून घ्या किंमत व फिचर्स

लावाचा हा दमदार बॅटरी आणि उत्तम कॅमेरा क्वॉलिटी असलेला स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. यामध्ये अँड्रॉइड 15 ओएस यांसारखी दमदार वैशिष्ट्ये आहेत. चला तर मग आजच्या लेखात या फोनची किंमत आणि उपलब्धता याबद्दल जाणून घेऊयात.

50 मेगापिक्सेल कॅमेरा आणि दमदार बॅटरीचा हा फोन स्वस्तात मिळतोय , जाणून घ्या किंमत व फिचर्स
| Edited By: | Updated on: Mar 31, 2026 | 10:57 PM
Share

तुम्ही जर 8 हजाराच्या बजेटमध्ये नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या किमतीच्या रेंजमध्ये Lava Bold N2 Pro भारतात लाँच झाला आहे. कंपनीच्या या एंट्री-लेव्हल स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर, 4जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट, अँड्रॉइड 15 आणि 5000mAh क्षमतेची पॉवरफूल बॅटरी आहे. त्यामुळे कमी किमतीत लाँच झालेला हा हँडसेट खरेदी करताना तुम्हाला किती पैसे खर्च करावे लागतील आणि हा फोन विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल आणि त्यात कोणती खास वैशिष्ट्ये आहेत. ते आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.

भारतात Lava Bold N2 Pro ची किंमत

कंपनीच्या म्हणण्यानुसार हा फोन ग्राहकांना 7 हजार 999 रूपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला आहे. तसेच या फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास फ्लिपकार्टवर 6 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता विक्री सुरू होईल. हा फोन अरोरा गोल्ड आणि इक्लिप्स ग्रे या रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्पर्धेच्या बाबतीत बोलायचे झाल्यास हा नवीन लावा स्मार्टफोन बजेट सेगमेंटमध्ये रेडमी ए5, सॅमसंग गॅलेक्सी एम07 आणि एआय प्लस पल्स 2 सारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करेल.

Lava Bold N2 Pro वैशिष्ट्ये

ऑपरेटिंग सिस्टम: हा ड्युअल-सिम (नॅनो + नॅनो) बजेट स्मार्टफोन अँड्रॉइड 15 वर चालतो आणि कंपनीच्या म्हणण्यानुसार याला अँड्रॉइड 16 चे अपडेट आणि दोन वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील.

चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी Unisoc T7250 चिपसेटसह 4जीबी रॅम उपलब्ध आहे.

कॅमेरा: फोटो आणि व्हिडिओसाठी 50-मेगापिक्सलचा मुख्य मागील कॅमेरा सेन्सर आहे. सेल्फीसाठी 8-मेगापिक्सलचा समोरचा कॅमेरा आहे.

आयपी रेटिंग: या फोनला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP54 रेटिंग मिळाले आहे.

स्क्रीन: या फोनमध्ये 6.75-इंचाचा HD+ रिझोल्यूशन स्क्रीन आहे जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.

कनेक्टिव्हिटी: हा स्मार्टफोन वाय-फाय, ब्लूटूथ, 4G LTE आणि जीपीएस कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करतो.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 5000mAh ची पॉवरफूल बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W पर्यंत फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात