7600mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर व उत्तम वैशिष्ट्यांसह ‘हा’ नवीन टॅबलेट जागतिक बाजारपेठेत झाला सादर

शाओमी कंपनीने त्यांचा रेडमी पॅड 2 एसई लाँच केला आहे, जो वाय-फाय आणि 4जी व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 7.4 मिमी जाडीच्या आणि 406 ग्रॅम वजनाच्या या टॅब्लेटमध्ये 120Hz डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि 7600mAh बॅटरी आहे. चला याची वैशिष्ट्ये जाणून घेऊयात.

7600mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन प्रोसेसर व उत्तम वैशिष्ट्यांसह हा नवीन टॅबलेट जागतिक बाजारपेठेत झाला सादर
tablets
| Edited By: | Updated on: Apr 24, 2026 | 1:55 PM

शाओमी कंपनीच्या Redmi Pad 2 SE हा टॅबलेट जागतिक बाजारात सादर केला आहे, जो वाय-फाय आणि वाय-फाय प्लस 4जी अशा दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध करण्यात आला आहे. तर जागतिक बाजारात लाँच केलेला हा टॅबलेट पातळ आणि हलका असून त्याची जाडी 7.4 मिमी आहे. त्याचे वजन अंदाजे 4.6 ग्रॅम आहे, ज्यामुळे बाहेर प्रवास तुम्ही अगदी सहज वापरू शकता. या टॅबलेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 9.7-इंचाचा 2के डिस्प्ले आहे. तो आउटडोअर मोडसह 600 निट्सपर्यंतची ब्राइटनेस देतो आणि लो ब्लू लाइट, फ्लिकर-फ्री व सर्केडियन मानकांसाठी TÜV Rheinland द्वारे प्रमाणित आहे. यात रीडिंग मोड, टच-ऑन-वेट आणि फ्लिकर-फ्री डिमिंगची सुविधा देखील आहे. चला या टॅबलेटची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात

Redmi Pad 2 SE तपशील

या टॅबलेटमध्ये 6nm स्नॅपड्रॅगन 6s 4G प्रोसेसर, ॲड्रेनो 610 GPU, 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज आहे, जे 2TB पर्यंत वाढवता येते. यात 7600mAh बॅटरी असून USB टाइप-C द्वारे 18W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे.

तसेच यात डॉल्बी ॲटमॉस आणि हाय-रेस ऑडिओ सपोर्टसह स्टिरिओ क्वाड स्पीकर्स आणि 3.5mm हेडफोन जॅक देखील आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास यात 8MP चा रियर कॅमेरा आणि 5MP चा फ्रंट कॅमेरा आहे. तसेच कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Wi-Fi 6 आणि ब्लूटूथ 5.0 चा समावेश आहे, तर सेल्युलर मॉडेलमध्ये ड्युअल 4G सिम सपोर्ट आणि GPS देखील आहे. ऑपरेटिंग सिस्टमच्या बाबतीत हा नवीन टॅब शाओमीच्या हायपरओएस 3 (HyperOS 3) वर चालतो.

Redmi Pad 2 SE किंमत

Redmi Pad 2 SE हा टॅबलेट डार्क ग्रे आणि सिल्व्हर रंगांमध्ये उपलब्ध असून, 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज (वाय-फाय मॉडेल) असलेल्या मॉडेलची किंमत सीएनवाय 1,199 म्हणजेच भारतीय चलनाच्या अंदाजे 16 हजार 445 रूपयांपासून सुरू होते. हा टॅबलेट भारतीय बाजारपेठेत अजून लाँच होईल की नाही, हे सांगण्यात आलेलं नाहीये. जर या किंमतीत भारतात हा टॅबलेट लॉन्च झाला, तर शाओमीचा हा नवीनतम टॅबलेट या किंमत श्रेणीतील लेनोवो आणि रियलमी सारख्या ब्रँड्सच्या टॅब्लेट्सशी स्पर्धा करू शकतो.

 

Follow Us