
तुम्ही जर फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल पण तुमचं बजेट कमी असेल तर आपण अशी एक डील आहे जी तुम्हाला आवडेल. फ्लिपकार्टवर OnePlus 13 या स्मार्टफोन मोठ्या डिस्काउंटसह विकला जात आहे, तर हा फोन 13 हजार 400 रूपयांची सवलत देण्यात आली आहे. या प्रकारच्या डील सहसा मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. या फोनची सवलतीची किंमत आणि वैशिष्ट्ये आपण आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात.
हा फ्लॅगशिप फोन 69 हजार 999 रूपयांमध्ये लाँच करण्यात आला होता, परंतु सध्या तो फ्लिपकार्टवर 59 हजार 499 रूपयांमध्ये विकला जात आहे. याचा अर्थ हा हँडसेट 10 हजार 500 रूपयांनी स्वस्त झाला असून या कमी किमतीत खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी आहे. फ्लिपकार्ट अॅक्सिस/एसबीआय क्रेडिट कार्ड वापरून केलेल्या पेमेंटवर 2,975 रूपयांची अतिरिक्त सूट देखील मिळते.
तुम्हाला जर अतिरिक्त सवलत हवी असेल, तर तुमचा जुना फोन एक्सचेंज करून अतिरिक्त सवलत मिळवू शकता. स्पर्धेच्या बाबत बोलायचे झाले तर हा फोन या किंमत श्रेणीतील iQOO, Apple, Vivo, Motorola आणि Samsung सारख्या प्रमुख ब्रँडच्या स्मार्टफोन्सना जोरदार स्पर्धा देतो.
या फ्लॅगशिप फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी अॅड्रेनो 830 जीपीयू आहे. हा फोन 24 जीबी पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1 टीबी पर्यंत यूएफएस 4.0 स्टोरेजसह उपलब्ध आहे. फोनमध्ये 6000 एमएएच बॅटरी आहे जी 100 वॅट वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 50 वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 6.82 इंचाचा क्यूएचडी+ एलटीपीओ ३के डिस्प्ले आहे जो 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट, एचडीआर10+ सपोर्ट आणि 4,500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस देतो.
कॅमेरा सेटअपच्या बाबतीत बोलायचे झाले तर या फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर, 3x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि 120x पर्यंत डिजिटल झूम सपोर्ट आहे. शिवाय, तुम्हाला 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देखील मिळेल.