6300mAh बॅटरी असलेला हा पॉवरफूल फोन झाला लाँच, 6 वर्षांपर्यंत मिळतील अपडेट्स
रेडमीचा हा 4 जी स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या बजेट स्मार्टफोनमध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 6300mAh क्षमतेची पॉवरफूल बॅटरी आहे. चला तर मग आजच्या लेखात फोनची विक्री केव्हा सुरू होईल ते जाणून घेऊयात.

Redmi A7 Pro 4G भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आला आहे. हा हँडसेट कमी बजेट असलेल्या ग्राहकांना लक्ष्य करतो, ज्यामध्ये 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 64GB स्टोरेज आहे. चला या स्मार्टफोनची किंमत तसेच विक्री कधी सुरू होईल आणि यात उपलब्ध असलेल्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊयात. या रेडमी स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 64GB व्हेरिएंटची किंमत 11 हजार 999 रूपये इतकी आहे. या हँडसेटचा एकच व्हेरिएंट लाँच करण्यात आला आहे. हे डिव्हाइस ब्लॅक आणि स्काय सनसेट ऑरेंज रंगांमध्ये उपलब्ध असेल. तसेच या फोनच्या उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास, या स्मार्टफोनची विक्री 23 एप्रिलपासून केवळ कंपनीच्या वेबसाइटवरच नाही, तर ॲमेझॉन, फ्लिपकार्ट आणि शाओमीच्या रिटेल आउटलेट्सवर देखील सुरू होईल. या किंमत श्रेणीमध्ये हा रेडमी फोन मोटोरोला g35 5G, पोको C85x, सॅमसंग गॅलेक्सी F06 5G आणि टेक्नो स्पार्क 10 प्रो सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल.
Redmi A7 Pro 4G वैशिष्ट्ये
स्क्रीन: या हँडसेटमध्ये 800 nits पर्यंत पीक ब्राइटनेस, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240p टच सॅम्पलिंग रेट असलेली 6.9-इंचाची LCD स्क्रीन आहे.
चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी या डिव्हाइसमध्ये युनिसॉक टी 7250 चिपसेटचा वापर केला आहे. हा फोन 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजसह येतो. मायक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 2 टीबी पर्यंत वाढवता येते.
ओएस: हे प्रो मॉडेल Android 16 वर आधारित HyperOS 3 वर चालते, या डिव्हाइसला कंपनीकडून 4 वर्षांचे अँड्रॉइड आणि 6 वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील.
कॅमेरा: प्रो व्हेरिएंटमध्ये एलईडी फ्लॅशसह 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि सेल्फीसाठी ८-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.
कनेक्टिव्हिटी: कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.2, वाय-फाय 5, जीपीएस, यूएसबी टाइप सी पोर्ट आहे.
बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 6300 mAh ची पॉवर बॅटरी देण्यात आली आहे, जी 15 वॅट वायर्ड आणि 7.5 वॅट रिव्हर्स वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.