धमाकेदार बॅटरीसह टेक्नोचा हा फोन भारतात झाला लाँच, जाणून घ्या जबरदस्त फिचर्स

टेक्नोचा हा फोन भारतात 20 हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत लाँच झाला आहे. या किंमतीत हा फोन पॉवरफूल बॅटरी आणि इतर अनेक प्रभावी वैशिष्ट्यांसह येतो. चला तर मग या फोनची किंमत आणि फिचर्स जाणून घेऊयात.

धमाकेदार बॅटरीसह टेक्नोचा हा फोन भारतात झाला लाँच, जाणून घ्या जबरदस्त फिचर्स
Tecno Spark 50 5G
| Edited By: | Updated on: Mar 28, 2026 | 1:11 PM

तुम्ही जर 20 हजार रूपयांपेक्षा कमी किमतीत नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर टेक्नो कंपनीचा Tecno Spark 50 5G स्मार्टफोन याच किंमतीच्या रेंजमध्ये लॉंच झाला आहे. या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये पॉवरफूल 6500mAh बॅटरीचा समावेश आहे. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊयात की हा डिव्हाइस कोणत्या किमतीत खरेदी करता येणार आहे. तसेच विक्रीसाठी कधी उपलब्ध होईल आणि त्यात कोणती वैशिष्ट्ये आहेत.

Tecno Spark 50 5G ची किंमत

Tecno Spark 50 5G हा मिंट ग्रीन, फँटसी पर्पल, इंक ब्लॅक आणि शॅम्पेन गोल्ड या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोनच्या मागील बाजूस एक मॉर्डन व हॉरिजॉन्टल कॅमेरा मॉड्यूल आहे. या हँडसेटच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 16 हजार 999 रूपये आहे, तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या टॉप व्हेरिएंटची किंमत 18 हजार 999 रूपये आहे.

स्पर्धेबद्दल बोलायचे झाल्यास, टेक्नो ब्रँडचा हा नवीनतम मिड-रेंज स्मार्टफोन या किंमतीच्या रेंजमध्ये vivo T5x 5G, MOTOROLA Edge 60 Fusion 5G, OPPO K14 5G, REDMI Note 14 SE 5G आणि Infinix Note 50s 5G+ सारख्या स्मार्टफोन्सशी स्पर्धा करेल.

Tecno Spark 50 5G खास फिचर्स

डिस्प्ले: या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेली 6.78-इंचाची HD प्लस स्क्रीन मिळेल, जी 240Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 560 nits पीक ब्राइटनेस सपोर्टसह येते.

चिपसेट: टेक्नो ब्रँडचा हा नवीनतम फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 ऑक्टा-कोर प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि ग्राफिक्ससाठी आर्म माली-जी57 एमसी2 जीपीयू आहे.

ऑपरेटिंग सिस्टम: हा टेक्नो फोन अँड्रॉइड 16 वर आधारित HiOS 16 वर चालतो.

कॅमेरा सेटअप : या फोनमध्ये 50-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

बॅटरी: फोनला पॉवर देण्यासाठी 45 W फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली शक्तिशाली 6500 mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Follow Us