5000 रुपयांपेक्षा कमी बजेटचा फोन खरेदी करायचा आहे का ? हे आहेत टॉप 5 पर्याय

५ हजार रुपयांच्या आतही फोनमध्ये यूट्यूब, फेसबुक, UPI, संगीत, कॅमेरा आणि स्मार्ट फीचर्स मिळू शकतात. स्मार्टफोन नसतानाही 'स्मार्ट' कामं करणारे हे मोबाईल्स तुमच्या खिशाला झळ न लागता तुमचं डिजिटल जग अधिक सोपं करतील!

5000 रुपयांपेक्षा कमी बजेटचा फोन खरेदी करायचा आहे का ? हे आहेत टॉप 5 पर्याय
| Edited By: | Updated on: May 04, 2025 | 2:23 PM

स्मार्टफोन आजच्या काळात केवळ लक्झरी राहिलेले नाहीत – ते आता गरज बनलेत. पण प्रत्येक जण १०-१५ हजार खर्चून महागडा फोन घेऊ शकतोच असं नाही. त्यामुळे एक स्वस्त, तरीही फिचर्सने भरलेला फोन हवा असेल तर? आश्चर्य वाटेल, पण ५ हजारांच्या आतही असे मोबाईल्स आहेत जे तुमचं डिजिटल लाईफ जबरदस्त सहज करू शकतात!

1. JioPhone Prima 2 किंमत: अंदाजे ₹2,799 (अंदाजे)

फीचर्स: KaiOS सिस्टीम, YouTube, Facebook, JioTV, Google Assistant, JioPay (UPI पेमेंट)

खासियत: स्वस्तात स्मार्टफिचर्स मिळणारा फीचर फोन

चार्जिंग: स्टँडर्ड Micro USB

बॅटरी: सुमारे 1800mAh

स्क्रीन साइज: सुमारे 2.4 इंच

2. Itel Flip One किंमत: अंदाजे ₹2,389 (अंदाजे)

फीचर्स: KingVoice (मेनू वाचून दाखवणं), ब्लूटूथ, MP3, कॅमेरा

खासियत: लेदर फिनिश लुक, मोठा आवाज, ज्येष्ठांसाठी सोयीचा

चार्जिंग: USB Type-C

बॅटरी: 1200mAh (7 दिवसांचा बॅकअप – कंपनीचा दावा)

स्क्रीन साइज: 2.4 इंच

3. Nokia 2660 Flip किंमत: ₹4,339 (अंदाजे)

फीचर्स: ड्युअल डिस्प्ले, मोठे बटण, FM रेडिओ, कॅमेरा

खासियत: ‘इमर्जन्सी बटण’ – 5 लोकांना एकाच वेळी SOS अलर्ट

चार्जिंग: Micro USB

बॅटरी: 1450mAh

स्क्रीन साइज: मुख्य स्क्रीन – 2.8 इंच, सेकंडरी स्क्रीन – सुमारे 1.7 इंच

4. Saregama Carvaan Don Lite M23 किंमत: ₹1,899 (अंदाजे)

फीचर्स: 351 प्री-लोडेड हिंदी गाणी, FM रेडिओ, ब्लूटूथ, कॅमेरा, वॉइस रेकॉर्डिंग

खासियत: संगीत प्रेमींसाठी खास फोन

चार्जिंग: Micro USB

बॅटरी: सुमारे 1800mAh

स्क्रीन साइज: सुमारे 2.4 इंच, 2.5D Tough Glass

5. Lava A5 (2025) किंमत: ₹1,222 (अंदाजे)

फीचर्स: बोल कीपॅड, कॉल रेकॉर्डिंग, MP3, UPI पेमेंटसाठी सपोर्ट

खासियत: अंध व ज्येष्ठ व्यक्तींना उपयुक्त ‘व्हॉइस फीचर’

चार्जिंग: Micro USB

बॅटरी: 1200mAh

स्क्रीन साइज: 2.4 इंच