Triumph कंपनीची Rocket 3 TFC ही बाईक लाँच, किंमत तब्बल…

| Updated on: Jun 25, 2019 | 11:39 PM

triumph या कंपनीने आपल्या नव्या आणि बहुप्रतिक्षित Rocket 3 TFC  ही बाईक लाँच केली असून त्याचे स्पेशिफिकेशन्स रिव्हील केले आहे. या नव्या बाईकमध्ये रायडर, रेन, रोड आणि स्पोर्टस यांसारखे चार रायडिंग मोड्स देण्यात आले आहे.

Triumph कंपनीची Rocket 3 TFC ही बाईक लाँच, किंमत तब्बल...
Follow us on

 नवी दिल्ली : triumph या कंपनीने आपल्या नव्या आणि बहुप्रतिक्षित Rocket 3 TFC  ही बाईक लाँच केली असून त्याचे स्पेशिफिकेशन्स रिव्हील केले आहे. या बाईकमध्ये 2500cc चे इंजिन देण्यात आले आहे. इंटीग्रेटेड गोप्रो कंट्रोल, टायर प्रेशर मॅनेजमेंट सिस्टम आणि की-लेस इंजिन यांसारख्या मॉर्डन फिचर्सने ही बाईक परिपूर्ण बनवण्यात आली आहे. Rocket 3 TFC ही बाईक लिमीटेड अॅडिशन असणार आहे. ही बाईक कस्टम प्रॉडक्शन डिपार्टमेंट तयार करणार असून याच्या काही ठरावीकच बाईकच तयार करण्यात येणार आहे.

triumph या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार या नव्या बाईकमध्ये डिझाईन क्रूझर स्टाईल देण्यात आली आहे. यात गोल आकाराचे ड्यूल हेडलॅम्प आणि अलॉय वील्ज देण्यात आले आहेत. या बाईकचा लूक एकदम खास डिझाईन करण्यात आला आहे. तसेच या बाईकच्या फ्यूल टँकची क्षमताही उत्तम आहे. तसेच या बाईकचे टायर रुंद आहेत.

विशेष म्हणजे या बाईकमध्ये बसवण्यात आलेल्या सर्व लाईट्स या एलईडी प्रकारातील आहेत. तसेच यात digital analog  instrument control ही देण्यात आले आहे. या बाईकचे वजन 323 किलो असून जे आधीच्या Rocket 3 बाईकपेक्षा 44 किलोने कमी आहे. Triumph UK या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या बाईकची किंमत 25 हजार पाऊंड म्हणजेच 22 लाख 7 हजार आहे.

नवीन Rocket 3 TFC बाईकमध्ये 2500cc चे दमदार इंजिन देण्यात आले आहे. तसेच यात 3 सिलेंडर इंजिन असून जे 182 एचपी पावर आणि 225 एनएम पीक टॉर्क जनरेट करतं. विशेष म्हणजे या बाईकच्या दोन्ही बाजूला डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. त्याशिवाय या नव्या बाईकमध्ये रायडर, रेन, रोड आणि स्पोर्टस यांसारखे चार रायडिंग मोड्स देण्यात आले आहे.

दरम्यान नव्या Rocket 3 TFC ही बाईक लिमिटेड अडिशन असल्याने कंपनी याच्या केवळ 750 बाईक्स बनवणार आहेत. Triumph UK या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार या बाईकची किंमत 25 हजार पाऊंड म्हणजेच 22 लाख 7 हजार आहे. पण triumph या कंपनीने आपल्या नव्या आणि बहुप्रतिक्षित Rocket 3 TFC सर्वच्या सर्व बाईक विकल्या गेल्या आहे. त्यामुळे Rocket 3 TFC याची पुन्हा एकदा प्रतीक्षा करावी लागणार आहे.

संबंधित बातम्या :

बजाज प्लॅटिनाचं नवं मॉडेल लाँच, किंमत फक्त…

TVS कंपनीची Apache RR 310 नव्या रुपात लाँच, किंमत तब्बल…