बजाज प्लॅटिनाचं नवं मॉडेल लाँच, किंमत फक्त…

काहीदिवसांपूर्वीच सोशल मीडियावर बजाज प्लॅटिनाचा नवीन मॉडल व्हायरल झाला होता. त्यामध्ये बजाज प्लॅटिनाच्या 110cc मॉडलबद्दल सांगितले होते. आता ही माहिती खरी ठरताना दिसत आहे. बजाज प्लॅटिना 110 H gear बाजारात लाँच झाली आहे. याचे वैशिष्ट असे की, यामध्ये एक खास गिअर दिलेला आहे.

बजाज प्लॅटिनाचं नवं मॉडेल लाँच, किंमत फक्त...
Follow us
| Updated on: Jun 04, 2019 | 8:39 PM

मुंबई : काहीदिवसांपूर्वीच सोशल मीडियावर बजाज प्लॅटिनाचा नवीन मॉडेल व्हायरल झाला होता. त्यामध्ये बजाज प्लॅटिनाच्या 110cc मॉडेलबद्दल सांगितले होते. आता ही माहिती खरी ठरताना दिसत आहे. बजाज प्लॅटिना 110 H gear बाजारात लाँच झाली आहे. याचे वैशिष्ट असे की, यामध्ये एक खास गिअर दिलेला आहे.

डिजिटल कन्सोल आणि गिअर-शिफ्ट-गाईडसारखे फीचर

Bajaj Platina 110 H-Gear देशातील पहिली बाईक आहे, ज्यामध्ये हायवे रायडिंगसाठी हायवे-गिअर दिलेला आहे. याशिवाय बजाजच्या बाईकमध्ये डिजिटल कन्सोल आणि गिअर-शिफ्ट-गाईडसारखे फीचर दिले आहेत. गिअर-शिफ्ट-गाईडने ड्रायव्हिंग दरम्यान गिअरला अपशिफ्ट आणि डाऊनशिफ्टसाठी मदत करेल. यामुळे रायडरला कळेल बाईक बरोबर गिअरमध्ये चालत आहे. हायवे गिअरमुळे बाईक लांबच्या प्रवासा दरम्यान हायवेवर उत्तम असा पिकअप आणि मायलेज देईल.

किंमत 53 हजार 376 रुपयांपासून सुरु

Bajaj Platina 110 H-Gear ड्रम व्हेरिअंटची एक्स शोरुम किंमत 53 हजार 376 रुपये आणि डिस्क व्हेरिअंटची किंमत 55 हजार 373 रुपये आहे. याशिवाय बाईकमध्ये अँटी स्किड ब्रेकिंग सिस्टम मिळेल. बाईकमध्ये नाईट्रॉक्स सस्पेंशनसह ComforTec टेक्नॉलॉजी, लांब सीट, मोठे फुट पॅड्ससारखे फीचर दिलेले आहेत.

11 लीटरचा फ्यूल टँक

Bajaj Platina 110 H-Gear मध्ये 115सीसी चे इंजिन दिले आहे. जे 7000 आरपीएमवर 8.6 पीएस पावर आणि 5000 आरपीएमवर 9.81 एनएमचा टॉर्क जनरेट करते. बजाजने या बाईकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्सचा फीचर दिला आहे. Bajaj Platina 110 H-Gear बाईकमध्ये 3 रंग दिलेले आहेत. Ebony Black सह Blue, Ebony Black सह Royal Burgundy आणि Ebony Black सह Cocktail wine Red सारखे रंग दिलेले आहेत. बाईकमध्ये 11 लीटरचा फ्यूल लीटरचा टँक दिला आहे.

17 इंचाचा ट्यूबलेस टायर

Platina 110 H-Gear ES Alloy CBS मध्ये 135 एमएमच्या टेलीस्कोपिक फ्रंट सस्पेंशन आणि 110 एमएमचे नाईट्रॉक्स गॅस कॅनिस्टर सस्पेंशन दिले आहे. तसेच बाईकचा व्हीलबेस 1255 एमएम, लांबी 2006 एमएम आणि चौडाई 704 एमएम आहे. बाईकमध्ये 17 इंचाचे 80/100 साइजचे ट्यूबलेस टायर दिले आहेत. तर डिस्कसोबत फ्रंट ब्रेकची साईज 240 एमएम आणि ड्रममध्ये सीबीएस फीचरसह रिअर ब्रेक साईज 110 एमएम दिली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.