AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विवोने लाँच केला 16 जीबीपर्यंत रॅम, 7050mAh बॅटरी असलेला नवीन 5जी स्मार्टफोन

विवोने भारतात आपला नवीन एस-सिरीज 5G फोन, विवो एस२, लॉन्च केला आहे, ज्यामध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7360-टर्बो चिपसेट आणि मोठी 7050mAh बॅटरी आहे. 16जीबी पर्यंत रॅम, 50एमपी ड्युअल कॅमेरा आणि 120Hz AMOLED डिस्प्ले देण्यात आलेलात

विवोने लाँच केला 16 जीबीपर्यंत रॅम, 7050mAh बॅटरी असलेला नवीन 5जी स्मार्टफोन
Vivo smartphoneImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 07, 2026 | 12:48 PM
Share

विवोने भारतात त्यांचा एस-सिरीजमध्ये एक नवीन 5G फोन लाँच केला आहे. कंपनीने हा फोन ‘Vivo S2’ या नावाने सादर केला आहे. जवळपास सात वर्षांनंतर कंपनीच्या एस-सिरीजमधील हे पहिले मॉडेल आहे. हे डिव्हाइस मीडियाटेक डायमेन्सिटी 7360-टर्बो चिपसेटवर चालते आणि यात 8 जीबी पर्यंत रॅम आहे. तसेच या फोनमध्ये 120 हर्ट्झ पर्यंतचा रिफ्रेश रेट आणि 6.83-इंचाचा AMOLED स्क्रीन देखील आहे. Vivo S2 हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर चला आधी त्याची किंमत फिचर्स आणि उपलब्धता याबद्दल जाणून घेऊयात.

Vivo S2 ची किंमत आणि उपलब्धता

किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतात Vivo S2 च्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटची किंमत 39 हजार 999 रूपयांपासून सुरू होते, तर 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 45 हजार 999 रूपये आहे.

हा फोन सफायर ब्लू, रीगल ब्राँझ आणि सिल्क व्हाइट या तीन रंगांमध्ये उपलब्ध केला आहे. तुम्ही तो विवो इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि देशभरातील निवडक ऑफलाइन रिटेल स्टोअर्समधून खरेदी करू शकता.

Vivo S2 चे फिचर्स

फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.83-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले आहे. ही स्क्रीन 3,000 nits पर्यंत लोकल पीक ब्राइटनेस आणि P3 वाइड कलर गॅमट देते. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले ऑप्टिकल फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. हे डिव्हाइस अँड्रॉइड 16-आधारित OriginOS 6 वर चालते.

या डिव्हाइसमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7360-टर्बो चिपसेट आहे. या फोनमध्ये 8GB पर्यंत LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेजचा पर्यायही उपलब्ध आहे. हे डिव्हाइस 8GB पर्यंतच्या एक्सटेंडेड रॅमला देखील सपोर्ट करते, ज्यामुळे तुम्हाला एकूण 16GB पर्यंत रॅम मिळते.

विवो एस2 कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

फोटोग्राफीसाठी विवो एस2 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. या फोनमध्ये f/1.8 अपर्चर असलेला 50-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि f/2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा आहे. समोरच्या बाजूला फोनमध्ये f/2.0 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

फ्रंट आणि रियर दोन्ही कॅमेरे 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगला सपोर्ट करतात. या फोनमध्ये 44W फ्लॅशचार्ज सपोर्टसह 7,050mAh क्षमतेची बॅटरी देखील आहे.

Follow Us
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...