Vivo V70 FE भारतात लॉंच, 200MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरीसह मिळणार खास फीचर्स
विवोचा हा फोन भारतीय बाजारपेठेत लॉंच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 200MP OIS कॅमेरा, OLED डिस्प्ले आणि 90W फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. यासोबतच सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्सही मिळतात. चला तर मग हो फोन कोणता आहे आणि किंमत आजच्या लेखात जाणून घेऊयात.

विवो कंपनीचा Vivo V70 FE भारतीय बाजारपेठेत लॉंच झाला आहे. या फोनच्या प्रमुख वैशिष्ट्यांमध्ये OLED डिस्प्ले असून हाय-रिझोल्यूशन 200-मेगापिक्सल कॅमेरा, फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि पॉवरफुल 7000mAh बॅटरी यांचा समावेश आहे. या फोनला कंपनीकडून सहा वर्षांसाठी सुरक्षा अपडेट्स देखील मिळणार आहे. चला, याची किंमत, विक्री कधी सुरू होईल आणि यात कोणती वैशिष्ट्ये असतील याबद्दल जाणून घेऊयात.
भारतातील विवो V70 FE ची किंमत
विवोच्या या फोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 37 हजार 999 रूपये आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 40 हजार 999 रूपये आहे आणि 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 44 हजार 999 रूपये आहे. हा फोन मॉनसून ब्लू आणि नॉर्दर्न लाइट्स पर्पल या रंगांमध्ये उपलब्ध केला आहे.
उपलब्धतेबद्दल बोलायचे झाल्यास हा फोन 9 एप्रिलपासून कंपनीच्या वेबसाइटवर, तसेच फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध होईल. फोन खरेदी करताना वापरण्यात आलेल्या एसबीआय कार्ड, अमेरिकन एक्सप्रेस, येस बँक आणि बँक ऑफ बडोदा यांसारख्या काही बँक कार्डांवर 10 % पर्यंत कॅशबॅक आणि इन्स्टंट डिस्काउंट मिळतील.
स्पर्धेच्या बाबतीत हा फोन वनप्लस 13आर 5जी, शाओमी 14 सिवी आणि विवो व्ही30 प्रो 5 जी यांसारख्या मॉडेल्सशी स्पर्धा करतो.
विवो V70 FE चे फिचर्स
डिस्प्ले: या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1900 nits पीक ब्राइटनेस आणि HDR10+ सर्टिफिकेशनसह 6.83-इंचाचा 1.5K रिझोल्यूशन OLED डिस्प्ले आहे.
चिपसेट: वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, 4nm ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 टर्बो प्रोसेसर देण्यात आला आहे.
ओएस: हा फो ओएस: न अँड्रॉइड 16 वर आधारित OriginOS 6 वर चालतो.
कॅमेरा: या फोनमध्ये मागील बाजूस ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 50-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये एआय मॅजिक वेदर, एआय मॅजिक लँडस्केप आणि एआय फोर-सीझन पोर्ट्रेट यांसारखी वैशिष्ट्ये देखील उपलब्ध आहेत.
प्रमुख वैशिष्ट्ये: यात डार्कनेस ग्लो टेक्नॉलॉजी आहे, ज्यामुळे कमी प्रकाशात सुद्धा आणि अतिनील किरणे किंवा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर मागील पॅनलमधून एक मंद चमक बाहेर पडते. हा फोन पाण्याच्या आतील फोटोग्राफीलाही सपोर्ट करतो.
बॅटरी: फोनमध्ये 7000mAh क्षमतेची पॉवरफुल बॅटरी आहे, जी 90W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि बायपास चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा फोन 60 मिनिटांत 1% पासून 100% पर्यंत चार्ज होऊ शकतो.
कनेक्टिव्हिटीबद्दल बोलायचे झाल्यास या पर्यायांमध्ये 5G, ड्युअल-बँड वाय-फाय, 4G LTE, ब्लूटूथ 5.4, NFC, GPS, GLONASS आणि एक USB टाइप-C पोर्ट यांचा समावेश आहे. बायोमेट्रिक प्रमाणीकरणासाठी डिस्प्लेमध्येच फिंगरप्रिंट सेन्सर आहे.