AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? सुनेत्रा पवार घेणार कोअर कमिटीची बैठक, बैठकीत कोणता फैसला होणार?

Special Report | अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? सुनेत्रा पवार घेणार कोअर कमिटीची बैठक, बैठकीत कोणता फैसला होणार?

| Updated on: May 19, 2026 | 9:55 AM
Share

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत मतभेद उफाळून आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. पक्षातील नेत्यांमधील वाढता विसंवाद आणि गैरसमज दूर करण्यासाठी खासदार सुनेत्रा पवार यांनी पुढाकार घेत कोअर कमिटीची बैठक बोलावल्याची माहिती समोर आली आहे.

दादांच्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नियुक्त्यांवरून पक्षात नाराजी असल्याचं चित्र दिसत आहे. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या पत्रात वरिष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नसल्याने चर्चांना आणखी उधाण आलं आहे. यानंतर सुनेत्रा पवार यांनी दोन्ही नेत्यांशी फोनवरून संवाद साधल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, कोअर कमिटी बैठकीनंतर पक्षातील आमदारांची स्वतंत्र बैठकही घेण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. पक्षात आमदारांचे दोन गट पडल्याची चर्चा असून, एक गट तटकरे-पटेल यांच्यासोबत तर दुसरा गट सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेला समर्थन देत असल्याचं बोललं जात आहे.
या सर्व घडामोडींमुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत सर्व काही आलबेल नसल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. मात्र या विषयावर सुनेत्रा पवार यांनी अद्याप माध्यमांसमोर थेट प्रतिक्रिया दिलेली नाही.

Published on: May 19, 2026 09:55 AM
Follow Us