AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल 200MP कॅमेऱ्याचा Vivo V70 FE या तारखेला भारतात लाँच होणार, किंमत किती ?

Vivo V70 FE Launch Date in India: हा फोन लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. कंपनीने Amazon वर तिच्या साईटची मायक्रोसाईट बनवली आहे. आणि एक्सवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. यात या फोनची वैशिष्ट्ये सांगितली आहे.

तब्बल 200MP कॅमेऱ्याचा Vivo V70 FE या तारखेला भारतात लाँच होणार, किंमत किती ?
Vivo V70 Fe India Launch
| Updated on: Mar 23, 2026 | 3:35 PM
Share

Vivo V70 FE हा स्मार्टफोन या महिन्याच्या सुरुवातीला इंडोनेशियात Vivo V70 सोबत लाँच केला होता. आता कंपनीने या संदर्भात दुजोरा दिला आहे की हा फोन भारतात V70 लाईनअपचे तिसरे मॉडेल म्हणून लाँच होऊ शकतो. या लाईनअपमध्ये आताही Vivo V70 Elite आणि Vivo V70 सामील आहेत. या अपकमिंग फोनसाठी कंपनीच्या साईट आणि Amazon वर डेडिकेटेड मायक्रोसाईट देखील तयार केली आहे. या वेबसाईटवर हळूहळू या फोनची वैशिष्ट्ये सादर केली जाणार आहेत. हा फोन भारतात किमान दोन कलर ऑप्शन आणि ड्युअल रिअर कॅमेरा युनिट्सह दाखल होणार आहे.

एक्सवर एका पोस्टमध्ये कंपनीने या गोष्टीची घोषणा केली आहे की Vivo V70 FE लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. Amazonवर फोनसाठी तयार केलेल्या मायक्रोसाईटवर दिलेल्या माहितीनुसार हा फोन कंपनीच्या साईटशिवाय व्हीवोच्या अधिकृत साईटवरही विकला जाणार आहे. याशिवाय या बाबीचाही खुलासा करण्यात आला आहे की ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सोबत या फोनमध्ये २०० मेगा पिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा सेंसर असणार आहे.

मात्र, कंपनीने अजूनपर्यंत या फोनच्या लाँचिंगची तारीख घोषीत केलेली नाही. परंतू टेक ब्लॉगर पारस गुगलानी यांनी दावा केला आहे की Vivo V70 FE भारतात २ एप्रिल रोजी लाँच होऊ शकतो. टिप्स्टरने सांगितले की हा फोन ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंट शिवाय १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये देखील उतरवला जाऊ शकतो. या डीव्हाईसची किंमत ३५,००० रुपयांहून कमी असण्याची शक्यता आहे. मात्र, बेस व्हेरिएंट ३०,००० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह उतरवला जाण्याची शक्यता आहे.ज्यात सुरुवाती बँक डिस्काऊंट आणि कॅशबॅक ऑफरचा समावेश आहे.

इंडोनेशियात किती किंमत ?

या कंपनीने काही आठवड्याआधी ९ मार्च रोजी इंडोनेशियात Vivo V70 FE ला IDR ६४,९९,००० ( सुमारे ३५,००० रुपये ) सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. ही किंमत कंपनीच्या ८ जीबी आणि २५६ जीबी स्टोरेजवाल्या बेस व्हेरिएंटची आहे.

Follow Us
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर
भोंदूबाबा खरातने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरलं... मोठा कारनामा समोर.
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त...
आताच सोनं खरेदी करा बरं... गेल्या 40 वर्षात झालं नव्हतं एवढं स्वस्त....
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक
शिवसेना- भाजपमध्ये तणाव, एकनाथ शिंदे यांची तातडीने मंत्र्यांसोबत बैठक.
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश
सातारा पोलीस अधीक्षकांचे निलंबन करा, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून आदेश.
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत....
मला अडवले, ओढत नेले... शंभुराज देसाई संतापले... विधान परिषदेत.....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत....
त्या सॉफ्ट टार्गेट, 9 माजी मंत्र्यांची चौकशी करा; संजय राऊत.....
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली
खरातसोबत कुणाकुणाचे संबंध? संजय राऊतांनी थेट नावच घेतली.
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?
'...तर कॅबिनेट मंत्री पद मिळाले असते, पण,'...काय म्हणाले योगेश कदम?.
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह..
जुन्या वादातून शेजाऱ्यांनी 7 वर्षांच्या मुलीला संपवले, पलंगात मृतदेह...
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी
भोंदूबाबाचे साटेलोटे, मुलीसोबत उपजिल्हाधिकाऱ्याच्या पतीची जमीन खरेदी.