दमदार फिचर्ससह लाँच झाला विवो एक्स फोल्ड 6 फोल्डेबल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फिचर्स

विवोने विवो एक्स फोल्ड 6 लाँच केला आहे. हा फोन मीडियाटेक प्रोसेसर, वाय-फाय 7, ब्लूटूथ आवृत्ती 5.4 आणि अमोलेड डिस्प्ले यांसारख्या अनेक प्रभावी वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. चला या फोनचे फिचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

दमदार फिचर्ससह लाँच झाला विवो एक्स फोल्ड 6 फोल्डेबल स्मार्टफोन, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त फिचर्स
vivo phone
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 27, 2026 | 7:40 PM

विवो कंपनीने त्यांचा नवीन Vivo X Fold 6 हा फोल्डेबल फोन बाजारपेठेत लाँच केला आहे. या फोल्डेबल फोनमध्ये गोल आकाराचा रिअर कॅमेरा मॉड्यूल आहे. या फोनमध्ये 8.02-इंचाचा सॅमसंग एम14 फोल्डेबल अमोलेड इनर डिस्प्ले, मीडियाटेक डायमेन्सिटी प्रोसेसर, 7000mAh बॅटरी आणि 20-मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर आहे. चला तर मग या फोल्डेबल फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊयात.

विवो एक्स फोल्ड 6 वैशिष्ट्ये

हा ड्युअल-सिम फोल्डेबल फोन अँड्रॉइड 16 वर आधारित OriginOS 6 Fold वर चालतो. यात सॅमसंग एम14 ल्युमिनेसेंट मटेरियलपासून बनवलेला 8.02-इंचाचा फोल्डेबल अमोलेड इनर डिस्प्ले आहे. या डिस्प्लेमध्ये 120Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट, 300Hz टच सॅम्पलिंग रेट आणि एचडीआर कंटेंट सपोर्ट यांसारखी वैशिष्ट्ये आहेत. या फोनमध्ये तुम्हाला 6.51-इंचाचा अमोलेड आउटर डिस्प्ले मिळेल.

वेग आणि मल्टीटास्किंगसाठी, या फोल्डेबल फोनमध्ये 3nm मीडियाटेक डायमेन्सिटी 9500 सुपर ऑक्टा-कोर चिपसेट आणि ग्राफिक्ससाठी ARM माली G1-अल्ट्रा GPU वापरण्यात आला आहे. सुरक्षेसाठी फोनमध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सपोर्ट आहे.

कॅमेरा सेटअपच्या बाबतीत बोलायचं झाल्यास या फोल्डेबल फोनमध्ये झाईस-ट्यून केलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 200-मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आहे. यासोबतच 50-मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 50-मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा आहे. फोनमध्ये आतल्या बाजूला आणि कव्हर डिस्प्लेवर 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे, आणि हे कॅमेरे 8K पर्यंत व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सक्षम आहे. यामध्ये 7000mAh बॅटरी असून ती 80W (वायर्ड) आणि 40W (वायरलेस) फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, वाय-फाय 7, 4G LTE, ब्लूटूथ 5.4 आणि GPS यांचा समावेश आहे.

विवो एक्स फोल्ड 6 ची किंमत

विवो फोल्डेबल फोनची किंमत 12GB रॅम आणि 256GB व्हेरिएंटसाठी CNY 7,999 म्हणजेच भारतीय चलनानुसार अंदाजे 1 लाख 11 हजार रूपये इतकी असेल. तर 12GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी CNY 8,999 अंदाजे 1 लाख 25 हजार रूपये. 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी CNY 10,999 भारतीय चलनानुसार 1 हजार 53 हजार आणि 16GB रॅम व 1TB स्टोरेज असलेल्या टॉप-ऑफ-द-लाइन मॉडेलसाठी CNY 11,299 अंदाजे रु. 1 लाख 57 हजार रूपये आहे. या फोनची ब्लॅक गोल्ड एडिशन देखील लाँच करण्यात आली आहे. सध्या, हा फोन चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. मात्र हा फोन भारतात कधी लाँच केला जाईल याबद्दल कोणतीही माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाहीये. परंतु कंपनी तो भारतीय बाजारपेठेतही लाँच करू शकते अशी अपेक्षा आहे.

Follow Us