तुमचं नाव घेऊन iPhone बोलेल धन्यवाद! जाणून घ्या कोणती आहे ही भन्नाट ट्रिक ?

तुम्हाला माहिती आहे का, तुमचं iPhone तुमचं नाव घेऊन तुम्हाला चार्जिंगदरम्यान "Thank you" म्हणू शकतं? होय, अनेक iPhone वापरकर्त्यांना या मजेशीर आणि स्मार्ट फीचरबद्दल माहितीच नसते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हे फिचर वापरण्याची संपूर्ण पद्धत सांगणार आहोत.

तुमचं नाव घेऊन iPhone बोलेल धन्यवाद! जाणून घ्या कोणती आहे ही भन्नाट ट्रिक ?
iphone
| Edited By: | Updated on: Jun 29, 2025 | 4:58 PM

iPhone वापरत असाल तर एक भन्नाट आणि मजेशीर फीचर तुमचं लक्ष वेधू शकतं. अनेकांना माहितीच नसते की त्यांच्या iPhone मध्ये एक अशी गुप्त ट्रिक लपलेली आहे, जी वापरून iPhone चार्जिंगला लावताच तुमचं नाव घेऊन “Thank You” म्हणू शकतो! होय, हे शक्य आहे iPhone च्या Shortcuts App च्या साहाय्याने. या फीचरने केवळ तुमचा फोन खास होतो, तर तुमचं टेक्निकल ज्ञानही अपग्रेड होतं. फक्त काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही हा ऑटोमेशन तयार करू शकता आणि तुमचं iPhone प्रत्येकवेळी चार्जिंग करताना तुमचं स्वागत करेल

iPhone मध्ये Shortcuts अ‍ॅप म्हणजे काय?

iPhone मध्ये ‘Shortcuts’ नावाचं एक इनबिल्ट अ‍ॅप दिलेलं असतं, ज्याच्या माध्यमातून तुम्ही अनेक गोष्टी ऑटोमेट करू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही एक शॉर्टकट तयार करू शकता की ज्यानंतर तुमचं फोन चार्जिंगला लागताच ते तुमचं नाव घेऊन “Thank you” म्हणेल.

ही भन्नाट ऑटोमेशन कशी सेट कराल?

  1. Shortcuts अ‍ॅप ओपन करा (iPhone मध्ये हे अ‍ॅप आधीच असतं) त्यात जाऊन ‘Automation’ या टॅबवर क्लिक करा.
  2. वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या ‘+’ चिन्हावर क्लिक करा.
  3. स्क्रोल करून खाली ‘Charger’ हा पर्याय निवडा.
  4. दोन ऑप्शनमध्ये ‘Is Connected’ हा पर्याय निवडा, म्हणजे चार्जिंग सुरू होताच ऑटोमेशन चालू होईल.
  5. ‘Ask Before Running’ हा पर्याय बंद ठेवा आणि ‘Run Immediately’ ऑन करा.
  6. पुढील टप्प्यावर ‘Speak Text’ निवडा आणि मग ‘Speak’ ऑप्शनवर क्लिक करा. येथे “Thank you [तुमचं नाव]” असे लिहा.
  7. शेवटी सर्व सेटिंग्स झाल्यावर ‘Done’ क्लिक करा.
  8. आता पुढच्या वेळेस तुम्ही तुमचा iPhone चार्जिंगला लावताच तो तुमचं नाव घेऊन “Thank you” म्हणेल

ऑटोमेशन डिलीट कसं कराल?

जर तुम्हाला हे ऑटोमेशन काढून टाकायचं असेल, तर Shortcuts अ‍ॅपमध्ये जाऊन ‘Automation’ टॅबमध्ये जा. संबंधित ऑटोमेशनवर डावीकडे स्वाइप करा आणि Delete वर क्लिक करा.

हा फिचर वापरण्याचा फायदा काय?

हा ऑटोमेशन सेट करताना तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळतो. तुम्ही “Thank you” ऐवजी “नमस्कार”, “Welcome back”, किंवा अगदी “चल चार्जिंग झाली!” असंही सेट करू शकता. हे केवळ मजा आणणं नाही, तर तुमचा फोन वैयक्तिक आणि खास बनवण्याचा एक मार्ग आहे.