काय आहे 5G? तुम्हाला किती स्पीड मिळेल?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:57 PM

मुंबई : भारतात 5G मोबाईल नेटवर्किंग सेवा डिसेंबर 2019 पर्यंत सुरु होणार आहे. 5G सेवेमुळे भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. यामुळे केवळ तुमच्या इंटरनेटचं स्पीडच वाढणार नाही तर, तुम्हाला नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलजीमध्ये घेऊन जाणार आहे. यामुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. 5G सेवेमुळे जगभरातील लाखो डिव्हाईस एकमेकांना कनेक्ट होतील. यामुळे लाखो लोकांना संपर्क साधता येणार […]

काय आहे 5G? तुम्हाला किती स्पीड मिळेल?
Follow us on

मुंबई : भारतात 5G मोबाईल नेटवर्किंग सेवा डिसेंबर 2019 पर्यंत सुरु होणार आहे. 5G सेवेमुळे भारतीय टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. यामुळे केवळ तुमच्या इंटरनेटचं स्पीडच वाढणार नाही तर, तुम्हाला नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलजीमध्ये घेऊन जाणार आहे. यामुळे टेलिकॉम क्षेत्रात मोठी क्रांती होणार आहे. 5G सेवेमुळे जगभरातील लाखो डिव्हाईस एकमेकांना कनेक्ट होतील. यामुळे लाखो लोकांना संपर्क साधता येणार आहेत. या डिव्हाईसमध्ये फ्रिज, सिक्युरिटी सिस्टीम आणि स्मार्ट सिटी यांचा समावेश आहे.

  5G सेवा

 मोबाईल इंडस्ट्री इंटरनेटच्या माध्यमातून नेटवर्क तयार करते. त्यानंतर ते नेटवर्क रिबील्ड होतं. त्यालाच आपण नेक्स्ट जनरेशन अर्थात ‘G’ असं म्हणतो. सध्या मोबाईल कंपन्या 4G LTE  नेटवर्कचा वापर करत आहेत. ही सेवा जलद असली तरी यामुळे युजर्सला अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. त्यामुळे  5G सेवा आल्यानंतर इंटरनेट सेवा जलद तर होईल, त्यासोबतच तुमच्या मोबाईल बॅटरीची समस्यादेखील संपणार आहे.  तुमची बॅटरी लवकर उतरणार नाहीच, शिवाय बॅटरीचं आयुष्यही वाढेल. 4 जी सेवेनुसार सध्या 1000 Mbps इंटरनेटचा सरासरी स्पीड आहे. मात्र, 5G सेवा अपडेट झाल्यानंतर प्रत्येकाला प्रति सेकंदाला 10,000 Mbps इतका स्पीड मिळेल.

कधी लाँच होणार?

मार्च महिन्यापासून अमेरिका टेलिकॉम कंपन्या दक्षिण कोरियात 5G सेवेची सुरुवात करणार आहेत. तसेच 2019 मध्ये डिसेंबर अखेरपर्यंत जपानदेखील 5G सेवा लाँच करेल. मात्र, चीन 5G सेवा 2020 मध्ये लाँच करणार आहे.  भारतात देखील 2019 पर्यंत 5G सेवा सुरु होईल. असं असलं तरी  5G सेवेचं जाळं भारतभर पसरण्यासाठी 2022 वर्ष उजडावं लागेल.

पहिला 5G स्मार्टफोन

वनप्लस, शाओमी आणि हुवावे या मोबाईल कंपन्या पहिला 5G स्मार्टफोन लाँच करतील. महत्त्वाचं म्हणजे 5G मोबाईल अधिक डेटा जनरेट करेल. त्यामुळे इंटरनेट वापरताना बफरिंगचा सामना करावा लागणार नाही. तसेच यात प्रायव्हसीची देखील काळजी घेतली आहे.