Whatsapp वर नववर्षाच्या शुभेच्छा लिंक पाठवून फसवणूक, अनेकांना लुबाडलं

| Updated on: Jan 06, 2020 | 12:21 PM

काही हॅकर्स व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवतात. वरवर पाहता ही लिंक नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारी वाटते.

Whatsapp वर नववर्षाच्या शुभेच्छा लिंक पाठवून फसवणूक, अनेकांना लुबाडलं
Follow us on

मुंबई : भारतात फेसबुक नंतर व्हॉट्सअॅप हे सर्वाधिक प्रमाणात वापरले जाणारे मेसेजिंग अॅप आहे. व्हॉट्सअॅप आता अनेकांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक बनला आहे. मात्र, या व्हॉट्सअॅपबाबत एक धक्कादायक माहिती (Whatsapp fraud) समोर आली आहे. व्हॉट्सअॅपवर खोटी लिंक पाठवून काही हॅकर्सनी लुबाडण्याचे धंदे सुरु केले आहेत (Whatsapp fraud) .

काही हॅकर्स व्हॉट्सअॅपवर एक लिंक पाठवतात. वरवर पाहता ही लिंक नव्या वर्षाच्या शुभेच्छा देणारी वाटते. मात्र, या लिंकवर क्लिक केल्यावर एक व्हायरस मोबाईलमध्ये शिरतो. हा व्हायरस मोबाईलमधील संपूर्ण माहिती काढून घेतो आणि हॅकर्सपर्यंत पोहोचवतो. नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने मोबाईलमध्ये येणाऱ्या या व्हायरसचे ‘New Year’s Virus’असे नाव आहे.

हॅकर्स या व्हायरसच्या मार्फत युजरच्या मोबाईलमधील बँकेच्या खात्यासंदर्भातील संपूर्ण माहिती चोरुन घेतात आणि त्याच माहितीच्या आधारे युजरच्या बँक खात्यातून पैसे लंपास करतात. अशाप्रकारच्या बऱ्याच घटना आतापर्यंत उघडकीस आल्या आहेत. त्यामुळे युजर्सनी अशा मेसेजेस आणि लिंकपासून सतर्क राहणे अत्यंत जरुरीचे आहे.

व्हॉट्सअॅपवर येणारे अशाप्रकारचे मॅसेज युजर्सला लिंकवर क्लिक करण्यासाठी भाग पाडतात. हॅकर्स वेगवेगळ्या प्रकारच्या सर्विस सब्सस्क्राईब करण्याची ऑफर देतात. मात्र, हे सर्व मेसेज ग्रीटिंगचे असतात. हे मॅसेच युजर्सच्या मनातील उत्कंठा वाढवतात आणि क्लिक करायला भाग पाडतात. युजर्स अशाप्रकारच्या लिंकवर क्लिक देखील करतात आणि आमिषाला बळी पडतात.

अशाप्रकारच्या लिंक व्हॉट्सअॅपवर व्हायरल होऊ नये, यासाठी योग्य प्रकारच्या यंत्रणा अंमलात यायला हवी. यासाठी काम सुरु देखील असेल मात्र सध्यातरी युजर्सने काळजी घेणे जास्त जरुरीचे आहे.

व्हॉट्सअॅप लवकरच आणणार नवे फिचर

व्हॉट्सअॅप आपल्या युजर्सला खूश करण्यासाठी नेहमी वेगवेगळे फिचर आणत असते. आता देखील व्हॉट्सअॅप पुढील काही दिवसांमध्ये नवे फिचर आणणार आहे. या फिचरध्ये युजरचा ग्रूपमध्ये सेट केलेला डेटा एका विशिष्ट कालावधीत आपोआप डिलीट होणार. या फिचरचा युजर्सला नक्की चांगला फायदा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.