WhatsApp चं नवं बीटा अपडेट, कॅमेरा आयकॉन बदलला

| Updated on: Nov 13, 2019 | 9:01 PM

WhatsApp ने एक नवीन अँड्रॉईड बीटा अपडेट जारी केलं आहे (WhatsApp Beta Update). यामध्ये व्हॉट्सअॅपच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत.

WhatsApp चं नवं बीटा अपडेट, कॅमेरा आयकॉन बदलला
Follow us on

मुंबई : WhatsApp ने एक नवीन अँड्रॉईड बीटा अपडेट जारी केलं आहे (WhatsApp Beta Update). यामध्ये व्हॉट्सअॅपच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. त्याशिवाय, एक बग (त्रुटी) देखील दुरुस्त करण्यात आलं आहे. हे अपडेट व्हॉट्सअॅपच्या बीटा व्हर्जन 2.19.328 मध्ये देण्यात आला आहे (WhatsApp Beta Update).

रिपोर्ट्सनुसार, आता व्हॉट्सअॅपचा कॅमेरा आयकॉन बदलण्यात आला आहे. आतापर्यंत हा आयकॉन इन्स्टाग्रामच्या कॅमेरा लोगो सारखा दिसायचा.

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅपचा हा नवीन कॅमेरा आयकॉन स्टेटस टॅबमध्ये दिसेल. त्याशिवाय, चॅट बारचा कॅमेरा आयकॉनही बदलण्यात आला आहे. आधी हा आयकॉन इन्स्टाग्रामच्या लोगोप्रमाणे दिसायचा आता तो नियमित कॅमेरा आयकॉनसारखा दिसेल.

त्याशिवाय, बीटा अपडेटमध्ये एक बगही दुरुस्त करण्यात आलं आहे. हा बग वॉईस मेसेज ऐकताना अचानक अॅप बंद करत होता. पण ही समस्या काहीच युझर्सच्या व्हॉट्सअॅपमध्ये येत होती. अपडेटसोबतच हे बगही दुरुस्त करण्यात आलं आहे.

यापूर्वी व्हॉट्सअॅपने Dark Mode आणि अधिक चांगलं Group invite सारखे फीचर्स दिले आहेत. तसेच, व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये तुम्हाला कोण अॅड करु शकेल याबाबत निर्णय घेण्याचा पर्याय व्हॉट्सअॅपने दिला आहे. तसेच, लूकमध्ये बदल करत व्हॉट्सअॅप डार्क मोड घेऊन आला आहे.