व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर, फोटो व्हिडीओ एकदाच पाहता येतोय, नंतर गायब, सायबर क्राईमचा धोका वाढला!

| Updated on: Sep 27, 2021 | 8:27 AM

व्हॉट्सअ‍ॅपने नुकतंच एक नवीन फिचर लॉंच केलं आहे. ‘फोटो सेट टू सी वन्स' या नवीन फिचरमुळे एखाद्या व्यक्तीने पाठवलेला फोटो - व्हिडीओ, आपण फक्त एकदा बघू शकतो. त्यानंतर तो फोटो -व्हीडिओ गायब होतो. म्हणजेच आपल्याला तो फोटो- व्हिडीओ परत बघता येत नाही.

व्हॉट्सअ‍ॅपचं नवं फिचर, फोटो व्हिडीओ एकदाच पाहता येतोय, नंतर गायब, सायबर क्राईमचा धोका वाढला!
WhatsApp new feature
Follow us on

नागपूर : व्हॉट्सअ‍ॅप आपल्या रोजच्या जीवनातली गरज बनली आहे. शैक्षणिक काम असोत, खाजगी कार्यालय, सरकारी कर्मचारी किंवा कुठलेही नेटकरी, आज प्रत्येकालाच व्हॉट्सअ‍ॅपची गरज आहे. त्यामुळेच स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप मोठं महत्त्व आहे. भारतात तब्बल 53 कोटी लोक व्हॉट्सअ‍ॅप वापरतात आणि रोज हा आकडा वाढतो आहे. आता व्हॉट्सअ‍ॅपने नुकतंच एक नवीन फिचर लॉंच केलं आहे. ‘फोटो सेट टू सी वन्स’ या नवीन फिचरमुळे एखाद्या व्यक्तीने पाठवलेला फोटो – व्हिडीओ, आपण फक्त एकदा बघू शकतो. त्यानंतर तो फोटो -व्हीडिओ गायब होतो. म्हणजेच आपल्याला तो फोटो- व्हिडीओ परत बघता येत नाही. ना परत त्या फोटोचा स्क्रिनशॉट काढता येत. मोबाईल फोनमधला डाटा आणि मेमरी सेव्ह करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने हे नवीन फिचर सुरु केलं आहे. पण या नव्या फिचरचा अट्टल गुन्हेगार गैरफायदा घेण्याची भीती आता तज्ज्ञ व्यक्त करत आहे.

व्हॉट्सअ‍ॅप नव्या फिचरवर एक्सपर्ट कमेंट्स

“‘फोटो सेट टू सी वन्स’ व्हॉट्सॅपच्या या नव्या फिचरची नेटकऱ्यांमध्ये सध्या जोरात चर्चा आहे. म्हणजे आपण पाठवलेला फोटो-व्हिडीओ दुसरा व्यक्ती फक्त एकदाच बघू शकतो. समजा फोटो आणि व्हिडीओचा वापर करुन एखाद्या सराईत गुन्हेगाराने कुणाला धमकी दिली, कुणाचा विनयभंग केला, किंवा कुणाला खाजगी फोटो व्हायरल करण्यासाठी खंडणी मागितली, किंवा फोटोच्या माध्यमातून जातीय- सांप्रदायिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. असे अनेक गुन्हे समाजात आज घडत आहेत. अशा वेळेस पोलीस तक्रारीच्या वेळेस पुरावा म्हणून त्या व्यक्तीने पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ दाखवणे गरजेचं असतं, पण व्हॉट्सअ‍ॅप ‘फोटो सेट टू सी वन्स’ या नव्या फिचरमुळे तो फोटो-व्हिडीओ आपल्याला परत बघता येत नाही. ना या गुन्हेगारांविरोधात त्याचा पुरावा म्हणून वापर करता येत.

Ajit parase

त्यामुळे या नव्या फिचरमुळे पुरावे न ठेवता गुन्हे करण्याचं धाडस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळेच नेटकऱ्यांनी व्हॉट्सॅपच्या नव्या फिचरच्या माध्यमातून फोटो- व्हिडीओ आला, तर त्याचा लगेच स्क्रिनशॉट काढणं गरजेचं आहे, शिवाय आता व्हॉट्सॅप वापरताना अधिक सजग राहण्याची गरज आहे” असं आवाहन सायबर तज्ज्ञ अजित पारसे यांनी केलं आहे.

सायबर गुन्ह्यांत वाढ

देशभरात 53 कोटी जनता व्हॉट्सअ‍ॅप वापरतात. हा आकडा झपाट्याने वाढतो आहे. ज्या वेगानं व्हॉट्सअ‍ॅप वापरणाऱ्यांची संख्या वाढत आहेत, त्याच वेगानं सायबर गुन्हेगारी सुद्धा वाढत आहे. एकट्या नागपूर शहरात वर्षभरात सायबर गुन्ह्यांच्या संख्येत 104 टक्के वाढ झाली आहे. सायबर गुन्हेदरात देशात नागपूरचा आठवा क्रमांक लागतो. नवनवे फिचर वापरुन हे गुन्हेगार गुन्हे करतात आणि प्रबळ पुराव्यांअभावी कायद्याच्या कचाट्यातून सुटतात, आणि पुन्हा गुन्हे करायला मोकाट असतात.

अशाच गुन्हेगारांसाठी व्हॉट्सअ‍ॅपचं ‘फोटो सेट टू सी वन्स’ हे फिचर गुन्हे करुन पुरावे मिटवण्याचं साधण ठरु शकते. त्यामुळे व्हॉट्सॅप वापरणाऱ्या प्रत्येकांनी सावध राहण्याची गरज आहे. व्हॉट्सॅपवर तुम्हाला येणारा फोटो, व्हिडीओ किंवा तुम्ही फॉरवर्ड करणारा फोटो, व्हीडीओ यातून गुन्हा तर घडत नाही ना? याची खबरदारी आज प्रत्येकाने घेणं गरेजंच आहे.

हे ही वाचा :

फेसबूक 50 लाखापर्यंत कर्ज देणार, 200 शहरांत सुविधा उपलब्ध, पण सायबर तज्ज्ञांकडून ‘हा’ सावधानतेचा इशारा