AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल की बात जुबां पर नही… WhatsApp स्टिकरवर उतरवा, नवे फीचर्स

तुम्ही WhatsApp युजर्स असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास आहे. WhatsApp ने नवे फीचर आणले आहे. WhatsApp च्या नव्या फीचरमुळे तुम्हाला च्रॅटिंगला आणखी मजा येऊ शकते. कारण, तुमच्या मनातली गोष्ट थेट WhatsApp स्टिकर्समध्ये उतरवता येणार.

दिल की बात जुबां पर नही... WhatsApp स्टिकरवर उतरवा, नवे फीचर्स
| Edited By: | Updated on: Jan 02, 2025 | 3:58 PM
Share

‘दिल की बात जुबां पर नही…’ आता थेट WhatsApp स्टिकरवर तुम्ही उतरवू शकता. WhatsApp चे नवे फीचर्स येत आहे. अँड्रॉइड युजर्सला आता चॅटिंगदरम्यान स्टिकर्स शेअरिंगचा अधिक आनंद मिळणार आहे. केवळ गर्लफ्रेंडच नाही तर मित्र-मैत्रिणींसोबतही तुम्ही अप्रतिम स्टिकर्स शेअर करू शकता. लवकरच तुम्ही तुमचे स्टिकर्स कस्टमाईज करू शकाल. स्टिकर फीचरच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट वेगळ्या पद्धतीने मांडू शकता. या अ‍ॅडव्हान्स अपकमिंग फीचरबद्दल संपूर्ण तपशील येथे वाचा.

WhatsApp चे नवे स्टिकर फीचर

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर WhatsApp बीटा व्हर्जन 2.24.25.2 मध्ये आले आहे. सध्या या नव्या फीचरची टेस्टिंग सुरू असून, निवडक अँड्रॉइड युजर्सच या फीचरचा फायदा घेऊ शकतात. लवकरच हे फीचर उर्वरित युजर्ससाठीही लॉन्च केले जाण्याची शक्यता आहे.

आता युजर्स स्वत:चा स्टिकर पॅक तयार करून शेअरही करू शकणार आहेत. याशिवाय संपूर्ण स्टिकर पॅक तुम्ही एकाच वेळी तुमच्या कॉन्टॅक्टसोबत शेअर करू शकाल, यासाठी तुम्हाला वेगळे स्टिकर्स पाठवण्याची गरज भासणार नाही.

स्टिकर पॅकची लिंक शेअर करता येणार

WhatsApp वर तयार करण्यात आलेल्या स्टिकर पॅकची लिंक तयार करून मित्र-मैत्रिणींसोबत शेअर करता येणार आहे, तुमचा मित्रही ते थेट डाऊनलोड करू शकणार आहे.

थर्ड पार्टी स्टिकर्सला अडचण नाही

थर्ड पार्टी स्टिकर्समध्ये कोणतीही अडचण येणार नाही, आपण त्यांना लिंक करू शकाल किंवा संपूर्ण पॅक मोठ्या प्रमाणात शेअर करू शकाल.

स्टिकरपॅकही डिलीट करू शकता

यात तुम्हाला मॅनेजमेंटचा पर्यायही मिळेल, तुम्हाला जे स्टिकर पॅक ठेवायचे आहेत ते तुम्ही तुमच्या लायब्ररीत ही ठेवू शकता, तुम्हाला गरज नसलेले स्टिकरपॅकही डिलीट करू शकता. चाचणीचा टप्पा पूर्ण होताच येत्या काही महिन्यांत ही सुविधा सुरू केली जाऊ शकते.

आणखी एक नवे फीचर

WhatsApp वर एक नवीन टायपिंग इंडिकेटरही पाहायला मिळणार आहे. नवीन टायपिंग इंडिकेटर आयफोनच्या आयमेसेज अ‍ॅपसारखा दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला टॉपवर शब्द टाईप करण्याऐवजी तीन डॉट्सचा अ‍ॅनिमेटेड चॅट बबल दिसेल. हे चॅट स्क्रीनवर च्या ऐवजी खालच्या बाजूला दिसेल. लवकरच हे फिचरही सुरू केले जाऊ शकते.

WhatsApp च्या नव्या फीचरमुळे तुम्हाला च्रॅटिंगला आणखी मजा येऊ शकते. कारण, तुमच्या मनातली गोष्ट थेट WhatsApp स्टिकर्समध्ये उतरवता येणार आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच