AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WhatsApp वर जुना मेसेज शोधायचा? ‘ही’ ट्रिक वापरा

व्हॉट्सॲपमध्ये अनेक फीचर्स आहेत जे युजर्ससाठी काम करतात. पूर्वी जुना मेसेज शोधण्यासाठी संपूर्ण चॅटवर वर-खाली स्क्रोल करावं लागायचं, तर आता तुम्ही जुना मेसेजही सहज या पद्धतीने सर्च करू शकता.

WhatsApp वर जुना मेसेज शोधायचा? 'ही' ट्रिक वापरा
| Edited By: | Updated on: Nov 29, 2024 | 5:55 PM
Share

व्हॉट्सॲपवर तुम्हाला जर एखादा महत्वाचा जुना मेसेज शोधण्यासाठी चॅट वर खाली करून स्क्रोल करावं लागतंय आणि एवढी मेहनत करून देखील मेसेज मिळाला नाहीतर, यासाठी तुमच्या या समस्येवर मात करण्यासाठी कंपनीने ॲपमध्ये वर्क फीचर ॲड केले आहे. जेणेकरून आता कोणत्याही तारखेचा जुना मेसेज चुटकीसरशी सहज मिळू शकेल. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही चुटकीसरशी जुने मेसेज कसे शोधू शकता.

या कामासाठी तुम्हाला फक्त काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी तुम्हाला आता संपूर्ण चॅट वर-खाली हलवण्याची आवश्यकता नाही, तुम्हाला फक्त ज्या दिवशीचा मेसेज शोधायचा असेल त्या दिवसाची तारीख माहित असणे आवश्यक आहे. डेट टाकल्यास तुमचे काम होईल.

व्हॉट्सॲप चॅटमध्ये जुने मेसेज कसे शोधावे

सर्वप्रथम फोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन करा.

ज्या चॅटमध्ये तुम्हाला मेसेज शोधायचा आहे ते ओपन करा.

चॅट स्क्रीनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करा आणि नंतर सर्च पर्याय निवडा.

सर्च बारमध्ये तुम्हाला कॅलेंडर आयकॉन दिसेल, या आयकॉनवर क्लिक करा.

कॅलेंडर चिन्हावर क्लिक करा आणि नंतर तुम्ही शोधत असलेली तारीख निवडा.

तुम्ही निवडलेल्या तारखेपासून तुम्हाला सर्व मेसेज दिसतील.

या फीचरचा फायदा

जुने संदेश शोधण्यासाठी तुम्हाला संपूर्ण चॅटमध्ये स्क्रोल करण्याची आवश्यकता नाही.

हे फीचर वापरण्यास अतिशय सोपे आहे.

हे फीचर तुम्हाला तुम्ही निवडलेल्या तारखेपासूनच मेसेज दाखवेल.

हे लक्षात ठेवा

व्हॉट्सॲपमधील सर्च बाय डेट फीचर खूप उपयुक्त आहे. हे फीचर तुम्ही वैयक्तिक आणि ग्रुप चॅटसाठी वापरू शकता. जर तुम्हाला महिनाभर सर्व मेसेज पाहायचे असतील तर तुम्ही कॅलेंडरमध्ये तो महिना सिलेक्ट करू शकता.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.