या मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार

| Updated on: Jun 27, 2019 | 11:15 AM

जगप्रसिद्ध आणि सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप या वर्षाच्या अखेरिस काही विंडोड फोनमध्ये काम करणार नाही, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअॅपने केली होती. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपने यूझर्सला आणखी मोठा धक्का दिला आहे. व्हॉट्सअॅपच्या अपडेटेड FAQ नुसार, व्हॉट्सअॅप काही अँड्रॉईड आणि iPhone मध्ये काम करणार नाही.

या मोबाईलवर व्हॉट्सअॅप बंद होणार
Follow us on

मुंबई : जगप्रसिद्ध आणि सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप या वर्षाच्या अखेरीस काही विंडोज फोनमध्ये काम करणार नाही, अशी घोषणा काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअॅपने केली होती. त्यानंतर आता व्हॉट्सअॅपने यूझर्सला आणखी मोठा धक्का दिला आहे. व्हॉट्सअॅपच्या अपडेटेड FAQ नुसार, व्हॉट्सअॅप काही अँड्रॉईड आणि iPhone मध्ये काम करणार नाही.

1 फेब्रुवारी 2020 नंतर व्हॉट्सअॅप बंद पडणार

Android 2.3.7 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या सर्व अँड्रॉईड स्मार्टफोन आणि iOS 7 वर चालणाऱ्या सर्व iPhones ना व्हॉट्सअॅप 1 फेब्रुवारी 2020 नंतर सपोर्ट करणार नाही, असं व्हॉट्सअॅपच्या FAQ मध्ये स्पष्ट करण्यात आलं. म्हणजेच या ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या अँड्रॉईड स्मार्टफोन आणि iPhone मध्ये व्हॉट्सअॅप काम करणार नाही. अँड्रॉईड 2.3.7 व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉईड स्मार्टफोन आणि iOS 7 वर चालणाऱ्या iPhone मध्ये युझर्स 1 फेब्रुवारी 2020 नंतर व्हॉट्सअॅपचं नवे अकाऊंट्स वापरु शकणार नाही. तसेच, ते त्यांच्या अकाऊंटला री-वेरिफायही करु शकणार नाही, असं अपडेटेड FAQ मध्ये सांगण्यात आलं आहे.

लेटेस्ट सॉफ्टवेअर व्हर्जन असलेले स्मार्टफोन वापरण्याचा सल्ला

अँड्रॉईड स्मार्टफोन आणि iPhone वर व्हॉट्सअॅप बंद करण्याच्या निर्णयाने जास्त युझर्सवर त्याचा परिणाम होणार नाही. जुने स्मार्टफोन आणि iPhones वापरणाऱ्यांवरच याचा परिणाम होईल, असं कंपनीने सांगतिलं. त्याशिवाय कंपनीने युझर्सला अँड्रॉईड 4.0.3 किंवा यानंतर आलेल्या सॉफ्टवेअर व्हर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोनचा वापर करण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. जेणेकरुन युझर्सला कुठल्याही प्रकारची असुविधा होऊ नये. iPhone युझर्सने iOS8 तसेच यानंतरच्या व्हर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोनचा वापर करावा, असंही कंपनीने सांगितलं.

व्हॉट्सअॅपच्या लेटेस्ट FAQ मध्ये युझर्सला Kai OS 2.5.1+ वर चालणाऱ्या फोनचा वापर करण्यास सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

स्मार्टफोनचं व्यसन सोडवण्यासाठी खास टिप्स

Triumph कंपनीची Rocket 3 TFC ही बाईक लाँच, किंमत तब्बल…

आता प्रकाशातून मिळणार डेटा कनेक्टीव्हिटी, नव्या बल्बच्या शोधानं नवी डेटाक्रांती!

व्हॉट्सअॅपच्या पिक्चर-इन-पिक्चरमध्ये नवीन अपडेट, आता बॅकग्राऊंडमध्येही व्हिडीओ दिसणार