
आजकाल आपण प्रत्येकजण दिवसभरात हजार वेळा आपला फोन हातात घेत असतो. त्याबरोबरच स्मार्टफोन दिसायला जेवढे स्लिम असतात तेवढेच त्यांच्या रचनेमागे खोल विचार करून ते डिझाईन केलेले असतात. फोनचा प्रत्येक पोर्ट, प्रत्येक बटन आणि त्यांची जागा ही एखाद्या डिझाईनचा भाग नसून तो त्यामागे असलेल्या मानवी सवयींचा एक मोठा अभ्यास आहे. अशातच तुमच्या कधी लक्षात आले आहे का की प्रत्येक कंपनीच्या फोनचे पॉवर बटण नेहमी उजव्या बाजूलाच का असते? ॲपल फोन असो वा सॅमसंग फोन किंवा इतर कंपनीचे स्मार्टफोन प्रत्येक कंपनी पॉवर बटण नेहमी उजव्या बाजूलाच असते. पण हे पॉवर बटन फोनच्या उजव्या बाजूलाच का असते याचं कारण मात्र बऱ्याच लोकांना माहीत असेल, पण असे असे काही लोकं आहेत ज्यांना याचे अचूक उत्तर माहीत नाही. तर आजच्या लेखात आपण स्मार्टफोनचे पॉवर बटन उजव्या बाजूलाच का असतं याचं नेमकं कराण जाणून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला स्मार्टफोन अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल.
आज बाजारात लाँच होणाऱ्या सर्व नवीन फोन्समध्ये पॉवर बटन उजव्या बाजूला असते, पण तुम्हाला माहित आहे का की जेव्हा स्मार्टफोन पहिल्यांदा आले तेव्हा पॉवर बटन एका निश्चित ठिकाणी नसायचे; काही कंपन्या ते फोनच्या वरच्या बाजूला, तर काही कंपन्या ते मागच्या बाजूला ठेवत असत.
जसे की आयफोन 5s मध्ये पॉवर बटन वरच्या बाजूला होते. आयफोन 6 पासून, कंपनीने पॉवर बटन उजव्या बाजूला हलवले. तसेच LG G3 फोनमध्ये पॉवर बटनला रिअर पॅनल म्हणजेच फोनच्या मागच्या बाजूला होते.
जगातील बहुसंख्य लोकं उजव्या हाताने काम करतात. जेव्हा आपण आपला फोन उजव्या हातात धरतो, तेव्हा आपला अंगठा फोनच्या वरच्या उजव्या कोपऱ्यापर्यंत पोहोचतो. पॉवर बटण उजव्या बाजूला ठेवण्याचे कारण हे आहे की, पकड न सोडता उजव्या बाजूने फोन लॉक आणि अनलॉक करणे सोपे जाते. कदाचित यामुळेच सुलभतेचा विचार करून, कंपन्या ग्राहकांच्या सोयीसाठी पॉवर बटण उजव्या बाजूला ठेवतात.