Truke Buds F1: सस्ते में मस्त है,बस चलता ही जावत है! 48 तासांच्या बॅटरी लाइफसह Truke चे बजेट इयरबड्स लाँच…

Truke Buds F1: सस्ते में मस्त है,बस चलता ही जावत है! 48 तासांच्या बॅटरी लाइफसह Truke चे बजेट इयरबड्स लाँच...
सस्ते में मस्त है,बस चलता ही जावत है!
Image Credit source: facebook

बहुप्रतीक्षीत Truke Buds F1 चे नुकतेच लाँचिंग करण्यात आले आहे. हे एक बजेट इयरबड्‌स असून त्यांची किंमत एक हजार रुपयांपेक्षाही कमी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाचा विचार करुन याची निर्मिती करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान फ्लिपकार्टद्वारे Truke Buds F1 ची विक्री केली जात आहे.

रचना भोंडवे

|

May 27, 2022 | 8:29 PM

ऑडिओ अॅक्सेसरीज ब्रँड Truke ने भारतात त्यांचे न्यू ब्रॅंड TWS इयरबड्स लाँच (launch) केले आहेत. कंपनीने याचे नाव Truke Buds F1 असे ठेवले आहे. हे TWS इयरबड्स अतिशय कमी किमतीत लाँच करण्यात आले आहेत. बजेटमध्ये असूनही कंपनीकडून यात विविध प्रकारचे उत्कृष्ट फीचर्स (Features) देण्यात आले आहेत. एखाद्या महागड्या इयरबड्‌सच्या तुलनेत यात विविध वैशिष्ट्ये देण्यात आलेली आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये याच्या खरेदीबाबत उत्साह दिसून येत आहे. Truke Buds F1 इयरबड्‌समध्ये कनेक्टिव्हिटीसाठी (Connectivity) नवीन ब्लूटूथ 5.3 चा सपोर्ट देण्यात आला आहे. यासोबतच यात 55ms कमी लेटन्सी मोड आहे. त्याची बॅटरी तब्बल दोन दिवस चालते असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.

Truke Buds F1 चे स्पेसिफिकेशन्स

Truke Buds F1 मध्ये इन्स्टंट पेअरिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या माध्यमातून जलद कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 5.3 ला सपोर्ट आहे. नवीन TWS इयरबड्समध्ये इनव्हायरलमेंटर नॉइस कॅन्सलेशन करण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. यासोबत ड्युअल माइक सपोर्ट देण्यात आला आहे. Truke Buds F1 अर्गोनॉमिक डिझाइनसह उपलब्ध आहे. या डिवाइसबद्दल कंपनीचा दावा आहे, की हे एका चार्जवर 48 तास चालते. हे पूर्ण चार्ज करण्यासाठी ९० मिनिटे लागतात. 55ms अल्ट्रा लो लेटन्सी मोडमुळे Truke Buds F1 गेमिंग ॲप्लिकेशन्सवरही उत्तम पध्दतीने काम करीत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. यासोबतच यामध्ये इनहेस्ड कंफर्टसाठी अनेक वैशिष्ट्ये जोडण्यात आली आहेत.

Truke Buds F1 किंमत काय

Truke Buds F1 इयरबड्स ब्लॅक आणि ब्लू कलर पर्यायांमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. हे Google Assistant आणि Siri ला देखील सपोर्ट करते. वॉटर रेसिस्टन्ससाठी याला IPX4 रेटिंग आहे. हे इयरबड्स केवळ ८९९ च्या किमतीत उपलब्ध आहे. ही ऑफर फक्त मर्यादीत कालावधीसाठी देण्यात आली आहे. त्याची नंतर किंमत 1299 रुपये असेल. हे ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरून खरेदी केले जाऊ शकते. Truke Buds F1 मध्ये विविध नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याने अगदी कमी किंमतीत ग्राहकांना चांगल्या क्वालिटीचे इयरबड्‌स उपलब्ध होणार आहेत.

हे सुद्धा वाचा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें