
लोकप्रिय स्मार्टफोन उत्पादक कंपनी शाओमीने जगातील सर्वात फास्ट स्मार्टफोन लाँच केला आहे. शाओमीने Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेटसह नवीन Xiaomi 17 स्मास्टफोन सीरिज लाँच केली आहे. हा प्रोसेसर असलेली ही जगातील पहिली स्मार्टफोन सीरिज आहे. कंपनीने Xiaomi 17 व्यतिरिक्त Xiaomi 17 Pro आणि Xiaomi 17 Pro Max हे फोन लाँच केले आहेत. या तिन्ही फोनमध्ये शक्तिशाली प्रोसेसर आणि फ्लॅगशिप-लेव्हल लीका कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. Xiaomi नंतर आता OnePlus, Realme आणि iQOO या कंपन्याही Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर असलेले स्मार्टफोन लाँच करणार आहेत.
Xiaomi 17 हा फोन चीनी बाजारात लाँच करण्यात आला आहे. आगामी काळात ही सीरिज जागतिक बाजारात लाँच होण्याची अपेक्षा आहे. या सीरिजमधील बेस मॉडेल 12GB RAM + 256GB, 12GB RAM + 512GB आणि 16GB RAM + 512GB तीन स्टोरेज प्रकारांमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत अनुक्रमे 56,000 रुपये, 60,000 रूपये आणि 62 हजार रुपये आहे.
Xiaomi १७ प्रो मॅक्स 12GB RAM + 512GB, 16GB RAM + 512GB, 16GB RAM + 1TB या तीन स्टोरेज प्रकारांमध्ये लाँच करण्यात आला आहे. याची किंमत अनुक्रमे 74,700 रुपये, 78,500 रुपये आणि 82,200 आहे. Xiaomi 17 Pro 12GB RAM + 256GB, 12GB RAM + 512GB, 16GB RAM + 512GB, आणि 16GB RAM + 1TB या चार स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. याची किंमत अनुक्रमे 63,200 रुपये, 66,000 रुपये, 69,700 रुपये, आणि 74,700 रुपये आहे.
या फोनमध्ये 6.3-इंचाचा 1.5K OLED डिस्प्लेसह येतो. हा डिस्प्ले 120Hz उच्च रिफ्रेश रेट आणि 3500 nits पर्यंतच्या ब्राइटनेसला सपोर्ट करतो. तसेच हा फोन HDR10+, HDR Vivid आणि Dolby Vision ला सपोर्ट करतो. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 प्रोसेसरवर काम करतो. Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 हा सर्वात वेगवान प्रोसेसर असलेली ही पहिलीच सीरिज आहे, त्यामुळे या सीरिजला चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.