शाओमीची नवी बाईक लाँच, किंमत किती?

| Updated on: Jul 05, 2019 | 3:57 PM

बिजींग (चीन) : बजेट स्मार्टफोन म्हणून भारतात शाओमी कंपनीला ओळखले जाते. ही कंपनी आता स्मार्टफोनशिवाय टीव्ही, फोन एक्सेसरीज, फिटनेस बँड, एअर प्यूरिफायर आणि इतर प्रोडक्ट्सही विकत असते. याशिवाय आता कंपनीने चीनमध्ये इलेक्ट्रॉनिक बाईक लाँच केली आहे. Himo T1 असं या बाईकचं नाव आहे. शाओमीचे स्मार्टफोन जसे कमी किंमतीत आहेत, तसेच त्यांनी लाँच केलेली बाईकही सर्व […]

शाओमीची नवी बाईक लाँच, किंमत किती?
Follow us on

बिजींग (चीन) : बजेट स्मार्टफोन म्हणून भारतात शाओमी कंपनीला ओळखले जाते. ही कंपनी आता स्मार्टफोनशिवाय टीव्ही, फोन एक्सेसरीज, फिटनेस बँड, एअर प्यूरिफायर आणि इतर प्रोडक्ट्सही विकत असते. याशिवाय आता कंपनीने चीनमध्ये इलेक्ट्रॉनिक बाईक लाँच केली आहे. Himo T1 असं या बाईकचं नाव आहे.

शाओमीचे स्मार्टफोन जसे कमी किंमतीत आहेत, तसेच त्यांनी लाँच केलेली बाईकही सर्व सामान्यांना परवडेल अशा किंमतीत आहे. 31 हजार रुपये या बाईकची किंमत आहे. नवीन बाईक कंपनीच्या क्राऊडफंडिग प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात. कंपनीकडून लाँच करण्यात आलेली Himo T1 ही पहिली इलेक्ट्रॉनिक बाईक नसून, यापूर्वीही कंपनीने Himo V1 आणि Himo C20 फोल्डिंग बाईक लाँच केल्या आहेत.

ही बाईक तीन रंगात उपलब्ध आहे.  यामध्ये लाल, ग्रे आणि व्हाईट रंगाचा समावेश आहे. Himo T1 मध्ये 14,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. बाईकमध्ये 14ah/28ah चा एनर्जी ऑप्शन दिला आहे. म्हणजे 14ah च्या मदतीने यूजर्स 60 किमी पर्यंत बाईक चालवू शकतो.

बाईकमध्ये फ्रंट सस्पेंशन फोर्क, ड्यूअल क्वाईलओर रिअर सस्पेंशन, ड्रम ब्रेक आणि फ्रंटमध्ये डिस्क ब्रेकची सुविधा दिली आहे. या बाईकचं वजन 53 किलो आहे.