Mi 9 Series : शाओमीचा आता ट्रिपल रिअर कॅमेरा फोन, पॉप सेल्फीही मिळणार!

| Updated on: May 29, 2019 | 8:55 PM

मुंबई : Xiaomi कंपनी लवकरच Mi 9 सीरिज अंतर्गत एक नवा स्मार्टफोन लाँच करु शकते. Xiaomi ने ट्वीट करत एक फोटो शेअर केला. यामध्ये स्मार्टफोनमध्ये तीन रिअर कॅमेरे आणि ग्रेडिएन्ट फिनिशची एक झलक दिसत आहे. या ट्वीटमध्ये कंपनीने युझर्स नव्या फोनसाठी कुठलं नाव पंसंत करतील असा प्रश्नही विचारला आहे. कंपनीने ट्वीटमध्ये #PopUpInStyle या हॅशटॅगचा वापर […]

Mi 9 Series : शाओमीचा आता ट्रिपल रिअर कॅमेरा फोन, पॉप सेल्फीही मिळणार!
Follow us on

मुंबई : Xiaomi कंपनी लवकरच Mi 9 सीरिज अंतर्गत एक नवा स्मार्टफोन लाँच करु शकते. Xiaomi ने ट्वीट करत एक फोटो शेअर केला. यामध्ये स्मार्टफोनमध्ये तीन रिअर कॅमेरे आणि ग्रेडिएन्ट फिनिशची एक झलक दिसत आहे. या ट्वीटमध्ये कंपनीने युझर्स नव्या फोनसाठी कुठलं नाव पंसंत करतील असा प्रश्नही विचारला आहे. कंपनीने ट्वीटमध्ये #PopUpInStyle या हॅशटॅगचा वापर केला, यावरुन कळून येतं की येणाऱ्या नव्या स्मार्टफोनमध्ये पॉप-अप सेल्फी कॅमरा असू शकतो.

Mi 9 सीरिजअंतर्गत येणाऱ्या या नव्या स्मार्टफोनबाबत इतर कुठलीही माहिती सध्या देण्यात आलेली नाही.  Xiaomi च्या या स्मार्टफोनचं नाव Mi 9T असू शकतं. Mi 9T या नावाला थायलँड आणि तायवानमध्ये सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. त्यामुळे या स्मार्टफोनचं नाव Mi 9T असण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Xiaomi च्या ट्वीटमधील स्मार्टफोन हा स्टॅण्डर्ड Xiaomi Mi 9 फ्लॅगशिप सारखा दिसत आहे. या स्मार्टफोनच्या मागच्या भागाला ग्रेडिएन्ट डिझाईन आणि बॅक पॅनलवर ट्रीपल कॅमरा मॉड्यूल आहे. Xiaomi Mi 9 सीरिजच्या पुढच्या स्मार्टफोनच्या टीझरमध्ये फूल-स्क्रिन डिझाईनची झलक दिसू शकते, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे स्टॅण्डर्ड Xiaomi Mi 9 मध्ये वाटरड्रॉप डिस्प्ले नॉच आहे.

कंपनीच्या नव्या स्मार्टफोनचं नाव Xiaomi MiK किंवा Xiaomi Mi 9I असू शकतं. काही वेळापूर्वी Xiaomi Mi 9T ला थायलँडमध्ये एनबीटीसी सर्टिफिकेशन आणि तायवानमध्ये एनसीसी सर्टिफिकेशन मिळालं होतं. त्यामुळे हा स्मार्टफोन लवकरच लाँच होण्याची शक्यता आहे. Redmi K20 हा स्मार्टफोन काही परदेशी बाजारात Mi 9T नावाने उतरवला जाऊ शकतो, अशीही चर्चा आहे. पण, Redmi K20 या स्मार्टफोनचं डिझाईन Xiaomi Mi 9 सीरिजच्या स्मार्टफोनपेक्षा खूप वेगळं आहे.