AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रेडमी नोट 7’ बंद होणार, कारण…

मुंबई : शाओमी ही चीनी कंपनी रेडमी नोट 7 हा स्मार्टफोन बंद करणार असल्याचे म्हटलं जात आहे. लवकरच हा फोन बाजारातून बाहेर होईल, अशी शक्यता कंपनीच्या ट्विटर पोस्टवरुन वर्तवली जात आहे. शाओमीने रेडमी नोट 7 S हा फोन नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10999 रुपये आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला […]

'रेडमी नोट 7' बंद होणार, कारण...
| Edited By: | Updated on: May 21, 2019 | 2:56 PM
Share

मुंबई : शाओमी ही चीनी कंपनी रेडमी नोट 7 हा स्मार्टफोन बंद करणार असल्याचे म्हटलं जात आहे. लवकरच हा फोन बाजारातून बाहेर होईल, अशी शक्यता कंपनीच्या ट्विटर पोस्टवरुन वर्तवली जात आहे. शाओमीने रेडमी नोट 7 S हा फोन नुकताच लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 10999 रुपये आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी लाँच केलेला रेडमी नोट 7 बंद करण्याचा शक्यता वर्तवण्यात येत आहे. या फोनची किंमत 9000 रुपये असून या फोनमध्येही 48 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

नुकतंच रेडमी कंपनीने रेडमी नोट 7 S लाँच केला होता. त्यानंतर रेडमी नोट 7 स्मार्टफोनचे काय होणार? असा प्रश्न अनेकजण उपस्थित करत होते. त्यानुसार कंपनीने रेडमी नोट 7 या फोनची विक्री कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. विक्री कमी केल्यानंतर काही दिवसानंतर हा फोन मार्केटमध्ये विकला जाणार नाही, असं कंपनीतर्फे सांगण्यात येत आहे.

रेडमी नोट 7 हा स्मार्टफोन बाजारात लाँच झाल्यानंतर अनेकांनी त्याला पसंती दर्शवली होती. ग्राहकांची पसंती लक्षात घेता कंपनीने रेडमी नोट 7 स्मार्टफोनला रेडमी नोट 7 S या स्मार्टफोनमध्ये रिप्लेस केलं आहे.

दरम्यान रेडमी नोट 7 बंद होणार यावर कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. पण कंपनीने अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन रेडमी नोट 7 बाजारातून बाहेर होईल याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. यामुळे अनेक यूजर्स संभ्रमात आहेत. दरम्यान, रेडमी नोट 7 यूजर्सला कोणतीही अडचण होणार नाही, असंही कंपनीने म्हटलं आहे.

रेडमी नोट 7 एस फोनची किंमत कंपनीने रेडमी नोट 7 प्रो पेक्षा कमी आणि रेडमी नोट 7 पेक्षा जास्त ठेवली आहे.

रेडमी नोट 7 एसच्या 3 जीबी रॅम व्हेरिअंटची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅमसोबत 64 जीबी मेमरी असलेल्या व्हेरिअंटमध्ये 12 हजार 999 रुपये दिली आहे. रेडमी नोट 7 एसची विक्री 23 मे पासून सुरु होणार आहे.

मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.