रात्री Wifi का बंद करावे? अर्ध्या लोकांना याचे फायदेच माहिती नाहीत

तुमच्यापैकी अनेकांच्या घरात वायफाय असेल. बऱ्याच लोकांच्या घरातील वायफाय 24 तास सुरु असते. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

रात्री Wifi का बंद करावे? अर्ध्या लोकांना याचे फायदेच माहिती नाहीत
wifi
| Updated on: Aug 24, 2025 | 10:35 PM

तुमच्यापैकी अनेकांच्या घरात वायफाय असेल. बऱ्याच लोकांच्या घरातील वायफाय 24 तास सुरु असते. याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. वायफाय सुरु असेल तर तुम्हाला रात्री चांगली झोप येत नाही, तसेच सकाळी उठताच थकवा जाणवतो. कारण वायफायचे सिग्नला तुमच्या झोपेसाठी घातक ठरू शकतात. काही अहवालांनुसार वायफायमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरीमुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रात्री वायफाय बंद करणे फायदेशी ठरते.

वायफायचे तोटे काय आहेत?

ऑस्ट्रेलियाच्या आरएमआयटी विद्यापीठाने याबाबत एक अहवाल सादर केला आहे. यानुसार वायफायच्या जवळ झोपणाऱ्या 27 टक्के लोकांना निद्रानाशासारख्या समस्या जाणवतात. तसेच 2021 च्या अहवालानुसार उंदरांवर याचा परिणान झाल्याचे नमूद करण्यात आले होते. 2.4 GHz वायफाय सिग्नलमुळे उंदरांची झोप कमी झाली होती. मात्र WHO आणि ICNIRP च्या म्हणण्यांनुसार वायफायचे रेडिएशन कमी असतात, याचा मानवाच्या झोपेवर परिणाम होत नाही. मात्र तरीही खबरदारी म्हणून तुम्ही ते बंद करु शकता.

वायफाय बंद करण्याचे फायदे काय आहेत?

तुमच्यापैकी ज्या लोकांना झोपेची समस्या असेल त्यांना रात्री वायफाय बंद केल्यास आराम मिळू शकतो. यामुळे तुम्ही गाढ झोपू शकता. त्याचबरोबर रात्री वायफाय बंद केल्यास वीज आणि इंटरनेटही वाचते. तसेय राउटरचे आयुष्यही वाढते. वायफाय रेडिएशनमुळे मोठे नुकसान होत नाही, मात्र ते बंद केल्याने मनाला शांती मिळते आणि ताणतणाव दूर होतो, त्यामुळे वायफाय बंद करणे फायद्याचे ठरेल.

वायफाय कधी बंद करू नये?

तुमच्या घरात कॅमेरा, स्मार्ट लाईट, व्हॉइस असिस्टंट अशी उपकरणे असतील तर वायफाय बंद करु नये. असे केल्याने या उपकरणांचे काम थांबेल. वायफायशिवाय स्मार्ट होम ऑटोमेशन नीट कार करु शकणार नाही. जर शक्य असल्यास, तुम्ही राउटर बेडरूमच्या बाहेर ठेवू शकता, ज्यामुळे रात्री झोपताना आराम मिळेल आणि तुमच्या घरातील उपकरणेही योग्यरित्या काम करतील. त्यामुळे तुमच्या घरात वायफाय असेल किंवा तुम्ही वायफाय घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही वरील मुद्यांचा एकदा नक्की विचार करावा.