AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप दुटप्पी, राजीनामा देतोय : आमदार अनिल गोटे

विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे : भाजपचे धोरण दुटप्पी असल्याची टीका करत, भाजप आमदार अनिल गोटे यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. लवकरच आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे आमदार अनिल गोटेंनी सांगितले. मात्र, गोटे राजीनामा नेमका कधी देणार, याबाबतची तारीख गुलदस्त्यात आहे. अनिल गोटे हे भाजपचे धुळ्यात अत्यंत महत्त्वाचे नेते मानले जातात. धडीडाचा कार्यकर्ता ते आमदार […]

भाजप दुटप्पी, राजीनामा देतोय : आमदार अनिल गोटे
| Edited By: | Updated on: Nov 12, 2018 | 5:38 PM
Share

विशाल ठाकूर, टीव्ही 9 मराठी, धुळे : भाजपचे धोरण दुटप्पी असल्याची टीका करत, भाजप आमदार अनिल गोटे यांनी राजीनाम्याची घोषणा केली आहे. लवकरच आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे आमदार अनिल गोटेंनी सांगितले. मात्र, गोटे राजीनामा नेमका कधी देणार, याबाबतची तारीख गुलदस्त्यात आहे.

अनिल गोटे हे भाजपचे धुळ्यात अत्यंत महत्त्वाचे नेते मानले जातात. धडीडाचा कार्यकर्ता ते आमदार असा त्यांचा संघर्षमय प्रवास आहे. त्यामुळे अर्थात पक्षात डावलल्यावर गोटे नाराज होणार, हे निश्चित मानले जात असताना, पक्षाने त्यांना डावलले. त्याचा परिणाम आता अनिल गोटेंनी आमदाराकीचा राजीनामा देण्याची घोषणा होण्यात झाला आहे.

धुळ्यात महापौरपदाचा उमेदवार मीच : गोटे

भाजपचे धुळ्याचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपविरुद्धचं दंड थोपटले आहेत. धुळे महानगरपालिकेच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी घेतलेली सभा स्वत: अनिल गोटेंनी उधळल्यानंतर, आता त्यांनी नवी घोषणा केली आहे. आमदार अनिल गोटे हे स्वत:च महापौरपदाचा उमेदवार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. अनिल गोटे यांनी शनिवारी रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांची सभा उधळून लावली. त्यानंतर रविवारी त्यांनी धुळ्यात जाहीर सभा घेऊन,  महापौरपदाचा उमेदवार स्वतः असल्याचं जाहीर केलं.

गिरीश महाजनांच्या नेतृत्त्वावर गोटे नाराज

येत्या 9 डिसेंबरला धुळे महापालिकेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सगळे राजकीय पक्ष कसून तयारीला लागले आहेत. जळगाव महापालिका निवडणुकीच्या यशानंतर भाजपला धुळे महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकवायचा आहे. या निवडणुकीची जबाबदारी भाजपने जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे सोपवली आहे. मात्र, गिरीश महाजन यांच्या नियुक्तीवर आमदार अनिल गोटे नाराज आहेत. त्यांनी स्वतः इच्छुकांच्या मुलाखती घेऊन तिकीट वाटप केली आहेत.

धुळे भाजपमध्ये दोन गट

धुळे लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. सुभाष भामरे आणि आमदार अनिल गोटे यांच्यातला वाद हा नवीन राहिलेला नाही. त्यातच या निवडणुकीसाठी डॉ. सुभाष भामरे यांनी देखील भाजपच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरुन महापालिका निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.भाजपमध्ये डॉ. भामरे आणि आमदार गोटे यांच्यात 2 गट पडले असून कोणत्या प्रभागात कोणाला तिकीट मिळणार याबाबत सुरुवातीपासून संभ्रम निर्माण झाला आहे.

भामरे आयारामांना संधी देत असल्याचा आरोप

आमदार अनिल गोटे यांनी स्वच्छ आणि कोरी पाटी असणाऱ्या तरुण उमेदवारांना संधी देण्याचे ठरवले आहे. मात्र दुसरीकडे डॉ. सुभाष भामरे हे राष्ट्रवादीसह अन्य पक्षातल्या आणि महत्वाची पदे घेऊन पक्षाला सोडचिठ्ठी दिलेल्या लोकांना भाजपात प्रवेश देत आहेत. त्यातल्या अनेक लोकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे देखील दाखल आहेत.

आमदार अनिल गोटे हे भाजपात तरुण उमेदवारांना संधी देऊ इच्छित असताना, दुसरीकडे भामरे हे आयारामांना संधी देत असल्याचा आरोप आहे. आमदार अनिल गोटे यांनी याबाबत वेळोवेळी पत्रक काढून भामरे यांच्यावर टीका देखील केली आहे.

Follow Us
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत
ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
मोठी घोषणा! ठाकरे बंधूंचं ठरलं; 26 तारखेला सरकारविरोधात शक्तीप्रदर्शन मोर्चा
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
29 वर्षांपूर्वी धर्मेंद्र प्रधानानंवर झाला होता लाठीचार्ज
हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
Raj Thackeray | हा कुठला सत्तेचा माज? राज ठाकरेंची मोदी सरकारवर सडकून टीका
पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार!
Priyanka Gandhi | पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर प्रियंका गांधींचा पलटवार! सरकारला दिलं थेट आव्हान
प्रधानांचा राजीनामा नाही पण चर्चेची तयारी? केंद्र सरकारची भूमिका काय?
Dharmendra Pradhan News |  धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याबाबत केंद्र सराकर नेमकी काय भूमिका घेणार?
विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय!
Uddhav Thackeray | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जनंतर उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय! म्हणाले...
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट
NEET पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या ट्विटवर CJP चं रिट्विट; थेट म्हणाले....
मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट
PM Modi Tweet | मोदींची मोठी घोषणा! NEET पेपरफुटीबाबत पंतप्रधान मोदींचं ट्विट