4 वर्षांच्या मुलाने चालवली आईची कार, पार्किंगमध्ये गाड्यांना मारली धडक, कडेवर नेण्यात आले पोलीस ठाण्यात

| Updated on: May 04, 2022 | 5:02 PM

वडिलांना ऑफिसला जाताना नेहमी पाहत असणाऱ्या मुलाला, आपणही गाडी चालवावी असे वाटत होते.

4 वर्षांच्या मुलाने चालवली आईची कार, पार्किंगमध्ये गाड्यांना मारली धडक, कडेवर नेण्यात आले पोलीस ठाण्यात
4years boy drives car
Image Credit source: Instagram
Follow us on

एम्सटर्डम – खेळण्या-खेळण्यात 4 वर्षांच्या मुलाने (4-year-old boy )आपल्या आईची कार (mother’s car)चालवल्याची धक्कादायक घटना नेदरलँडमध्ये (Netherlands)घडली आहे. वडिलांना ऑफिसला जाताना नेहमी पाहत असणाऱ्या मुलाला, आपणही वडिलांप्रमाणे गाडी चालवावे, असे वाटत होते. त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी, त्याने आईच्या अपरोक्ष कारची किल्ली घेतली आणि तो कार चालवण्यासाठी घराबाहेर पडला. त्याने कार सुरुही केली, मात्र सुदैवाने थोड्याच अंतरावर पार्किंगमध्ये असलेल्या दुसऱ्या गाड्यांना त्याच्या कारची धडक बसली. स्थानिकांनी हे पाहिल्यानंतर तातडीनं ही माहिती पोलिसांना देण्यात आली. घटनास्थळी पोहचल्यानंतर चार वर्षांच्या मुलाला ड्रायव्हरच्या सीटवर पाहून, त्यांनाही धक्का बसला. पोलिसांनी या मुलाला कडेवर उचलून पोलीस ठाण्यात नेले. त्यानंतर त्याच्या आईला बोलावण्यात आले आणि मुलाला त्या आईकडे सोपवण्यात आले. सुदैवाने या घटनेत मुलाला आणि इतर कुणालाही काहीही दुखापत झाली नाही, हे नशीब.

पोलीस ठाण्यात चॉकलेट आणि खेळण्यांनी स्वागत

हीच चूक जर इतर कुणा मोठ्या माणसाची असती तर त्याला नक्कीच दंड आणि पोलिसांच्या शिव्याही पडल्या असत्या. मात्र या मुलाचं वय पाहता, पोलीस ठाण्यात त्याला चॉकलेट्स आणि खेळणी देण्यात आली. त्यानंतर कागदोपत्री कारवाी करुन या मुलाला त्याच्या आईकडे सुखरुप सोपवण्यात आले. आईला, यापुढे मुलाकडे लक्ष द्या, असा सल्लाही देण्यात आलाय.

हे सुद्धा वाचा

 

लहानग्याने सांगितले कशी चालवली कार

मुलाला घटनास्थळी जेव्हा पोलिसांनी कुतुहलाने विचारले की कार कशी सुरु केली, तेव्हा या लहानग्याने स्पेट बाय स्टेप कार कशी सुरु केली, याचे प्रात्यक्षिच पोलिसांना करुन दाखवले. त्याच्या आईसोबत प्रवास करताना त्याने हे सगळे निरीक्षणातून आत्मसात केले होते. पुढच्या वेळेपासून कारची किल्ली लपवून ठेवा, असा सल्ला पोलिसांनी आईला दिला.

नवीन फॉर्म्युला वन ड्रायव्हर मिळाला – पोलीस

या घटनेनंतर पोलिसांनी या सगळ्या प्रकाराची एक मजेदार पोस्ट लिहिली आणि इन्स्टावर पोस्ट केली. यात पोलिसांनी नवा मैक्स वेरस्टैपेन मिळाल्याचे लिहिले आहे. मैक्स हा नेदरलँडचा रहिवासी असून 2021 च्या फॉर्म्युला वनचा विजेता आहे.