पापडामुळे भांडण, नवरदेवाच्या मित्रांचे कुटाणे! आधी शाब्दिक नंतर काय तो टेबल, काय ती खुर्ची….

इथे लग्न म्हणजे दोन लोकांचं नाही दोन कुटुंबाचं असतं. गोंधळ पाहावा तर लग्नांनी! आपोआप इथे दोन गट होतात. एक वर पक्ष आणि एक वधू पक्ष. या दोन्ही पक्षांमध्ये लग्नात प्रचंड चढाओढ असते.

पापडामुळे भांडण, नवरदेवाच्या मित्रांचे कुटाणे! आधी शाब्दिक नंतर काय तो टेबल, काय ती खुर्ची....
Keral Marriage Viral VideoImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 11:05 AM

भारतात लग्न (Marriage In India) करणे म्हणजे एक मोठा सण आहे. इथे लग्न म्हणजे दोन लोकांचं नाही दोन कुटुंबाचं असतं. गोंधळ पाहावा तर लग्नांनी! आपोआप इथे दोन गट होतात. एक वर पक्ष आणि एक वधू पक्ष. या दोन्ही पक्षांमध्ये लग्नात प्रचंड चढाओढ असते. ही चढाओढ फारच ठराविक काळासाठी असते. एकदा लग्न पार पडलं की अशा गोष्टी कुणी लक्षात देखील ठेवत नाही अशी असते ही चढाओढ. अशीच एक घटना एका लग्नात घडलीये. खरं तर ही चढाओढ नाही भांडणच आहे. एका लग्नातला मारामारीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालाय. हा व्हिडीओ केरळमधला आहे. लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी (Groom) जेवताना पापडाची डिमांड (Demand In Marriage) केली. पापड मिळाला नाही म्हणून मारामारी केली. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्यानं व्हायरल झालाय. एका पापडामुळे व्हायरल झालेला हा व्हिडीओ, लोकांना हे बघून हसावं की रडावं असं झालंय.

पापडामुळे भांडण

ही घटना अलाप्पुझा जिल्ह्यात घडलीये. नवरदेवाच्या मित्रांनी आणखी पापड मागितले, त्यांना नकार दिला गेला. वाद फक्त इतकाच होता.

पापड न मिळाल्यामुळे सुरुवातीला आपापसात शाब्दिक वाद सुरू झाला. थोड्याच वेळात शाब्दिक वादाचं रूपांतर मारामारीत झालं.

ही सगळी नवरदेवाची मित्रमंडळी होती. जे काही घडलं त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

वाद इतका टोकाला गेला की अखेर पोलिसांना या प्रकरणात येऊन हस्तक्षेप करावा लागला. ऑनलाईन व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये लग्नाच्या वातावरणात कसा गोंधळ माजतोय हे पाहायला मिळत आहे.

व्हिडीओ

व्हिडीओमध्ये नेमकं काय आहे?

लग्नाच्या हॉलमध्ये दोन गट एकमेकांशी भांडत असतात, लोक एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत दिसतायत.

हे भांडण इतकं टोकाला जातं की बॉक्सिंगच नव्हे तर खुर्च्या आणि टेबलही एकमेकांवर भिरकावली जातायत. काही लोक डायनिंग टेबलजवळ ठेवलेल्या बादल्यांनीही एकमेकांना मारतात.

ही क्लिप एका युजरने ट्विटरवर शेअर केली आहे, ज्यात लिहिले आहे की, “100 टक्के साक्षर केरळ राज्यात, एका लग्नात भांडण झाले जेव्हा वधूच्या मित्रांनी मेजवानीदरम्यान पापडची मागणी केली होती.”

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.