भूतांच्या अफवांनी आलिशान महालाची वाट, ब्रिटनमधला या महालाजवळ जाण्याची आजही कुणाची हिंमत नाही

| Updated on: Oct 05, 2021 | 2:03 PM

हा महाल बकिंघम पॅलेसपेक्षाही (Buckingham Palace) मोठा आहे, जे सध्या ब्रिटनच्या राणीचे निवासस्थान आहे. पण, हा महाल अफवांचा बळी पडला, आणि आज काळाच्या पडद्याआड जाऊ पाहतो आहे.

भूतांच्या अफवांनी आलिशान महालाची वाट, ब्रिटनमधला या महालाजवळ जाण्याची आजही कुणाची हिंमत नाही
हे यूकेच्या इतिहासातील हे सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे, पण आज हा महाल भग्नावस्थेत आहे.
Follow us on

जगात अशा अनेक वास्तू आहेत, ज्या इतक्या भव्य आहेत, की त्यांची ख्याती ही जगभर पोहचलेली आहे. त्यांची रचना, त्यातील भव्यता आणि कलाकुसरीमुळे या वास्तू जगभरात आश्चर्याचं कारण ठरतात. मात्र, जगात अशा काही इमारती (Huge Mansion) आहेत ज्या अतिशय विचित्र कारणांमुळे चर्चेत राहतात. त्यातीलत एक ब्रिटनमधील या आलिशान महालाचा समावेश आहे. हा महाल बकिंघम पॅलेसपेक्षाही (Buckingham Palace) मोठा आहे, जे सध्या ब्रिटनच्या राणीचे निवासस्थान आहे. पण, हा महाल अफवांचा बळी पडला, आणि आज काळाच्या पडद्याआड जाऊ पाहतो आहे. ( A palace bigger than Britain’s Buckingham Palace is closed due to ghost rumors, know history)

सध्या हा आलिशान महाल झाडा-झुडुपांच्या आड गेला आहे. याचं बांधकाम 1985 मध्ये सुरू झालं. हे यूकेच्या इतिहासातील हे सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे, पण आज हा महाल भग्नावस्थेत आहे. या महालाला ब्रिटीश मल्टी मिलियनेयर निकोलस व्हॅन हुगस्ट्राटेन यांनी डिझाइन केलं होते. पण हा महाल कधीच पूर्ण होऊ शकला नाही, आणि याला कारण एक अफवा

अफवांनी कोट्यवधींचा महाल उद्ध्वस्त केला

या महालाचे बांधकाम 1985 मध्ये सुरू झाले. तो अर्ध्याहून अधिक बनवला गेला, पण त्यानंतर अफवांचा बाजार सुरू झाला. असं म्हटले जाते की, खूप कमी लोकांना या ठिकाणी भेट दिली. कुणीतरी अफवा पसरवली की, हा महाल भूतांचं घर आहे. तेव्हापासून त्याला घोस्ट हाऊस ऑफ द ससेक्स म्हटलं जातं.

महालाच्या आत कुणीही जात नाही

या महालाच्या प्रवेशद्वाराजवळच जायची कुणाची हिंमत होत नाही. आत जाणं तर खूप दूरच राहिलं. 2000 साली एक पत्रकार आत गेले आणि त्याने सांगितलं की, आतमध्ये एख रिसेप्शन हॉल आहे, जिथून पायऱ्या वरच्या दिशेने जातात. काही ठिकाणी लिफ्टही बसवण्यात आल्या आहे. हेच नाही तर आत नक्षीदार खांब आहेत, जे महागड्या दगडांपासून बनवलेले आहेत. मात्र आता हा महाल जंगलांनी वेढलेला आहे.

2 हजार वर्षांपर्यंत महाल असाच राहिल

आता महालाबद्दल असं बोललं जातं की तो कमकुवत झाला आहे, त्याचं छत कधीही कोसळू शकतं. मात्र महालाची रचना करणाऱ्या निकोलस फॉरेस्टच्या मते, हा महाल खूप मजबूतपणे बांधला गेला, पुढच्या 2 हजार वर्षांपर्यंत त्याला काहीही होणार नाही. अत्यंत आलिशान अशी ही वास्तू फक्त अफवांमुळे आज उद्ध्वस्त झाली आहे. या पॅलेसचे फोटोही सॅटेलाईटवरुन घेतले आहे, त्याच्याजवळ जाण्याचं धाडस कुणी करत नाही.

हेही वाचा:

23000 वर्षांपूर्वी उत्तरी अमेरिकेत माणसं राहायची, आशिया ते अमेरिका स्थलांतर, पायांच्या ठशांनी इतिहास जिवंत केला!

Nobel Prize 2021: वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा, त्वचेवर संशोधन करणाऱ्या डेव्हिड ज्युलिअस, अर्डेम पटापौटियन यांना नोबेल पुरस्कार