AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nobel Prize 2021: वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा, त्वचेवर संशोधन करणाऱ्या डेव्हिड ज्युलिअस, अर्डेम पटापौटियन यांना नोबेल पुरस्कार

आतापर्यंत काय हा प्रश्न असायचा की, तापमान, उब आणि थंडी वाजणं हे नेमकं कसं होतं. किंवा स्पर्श झाल्यानंतर व्यक्तीला लगेच कसं कळतं. हीच गोष्ट या शास्रज्ञांनी शोधली

Nobel Prize 2021: वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा, त्वचेवर संशोधन करणाऱ्या डेव्हिड ज्युलिअस, अर्डेम पटापौटियन यांना नोबेल पुरस्कार
2021 चा वैद्यकिय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार डेव्हिड ज्युलिअस (David Julius) आणि अर्डेम पटापौटियन (Ardem Patapoutian) यांना मिळाला आहे.
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 5:20 PM
Share

स्कॉटहोम: 2021 च्या वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्काराची (Nobel Prize 2021) घोषणा झाली आहे. 2021 चा वैद्यकिय क्षेत्रातील नोबेल पुरस्कार डेव्हिड ज्युलिअस (David Julius) आणि अर्डेम पटापौटियन (Ardem Patapoutian) यांना मिळाला आहे. या दोघांनीही तापमान आणि स्पर्श संवेदना जाणवण्यासाठी रिसेप्टर्सवर संशोधन केलं आहे. मागच्या वर्षी हा पुरस्कार हार्वे अल्टर (Harvey Alter), मायकल हॉगटन (Michael Houghton) आणि चार्लस राईस ( Charles Rice) या तिघांमध्ये विभागून देण्यात आला होता. या तिघांनीही मिळून हॅपिटायटीस विषाणूवर संशोधन केलं होतं. (The 2021 Nobel Prize in Medicine has been awarded to David Julius and Ardem Patapoutian.)

वैद्यकीय क्षेत्रात मोठं संशोधन

नोबेल समितीच्या म्हणण्यानुसार, डेविड आणि अर्डेम यांनी खूप मोठं संशोधन केलं आहे. आपल्या त्वचेच्या आतील नसांवर तापमान आणि दाब याचा वेगवेगळा परिणाम होता. आतापर्यंत काय हा प्रश्न असायचा की, तापमान, उब आणि थंडी वाजणं हे नेमकं कसं होतं. किंवा स्पर्श झाल्यानंतर व्यक्तीला लगेच कसं कळतं. हीच गोष्ट या शास्रज्ञांनी शोधली, त्यांच्या मते, या सगळ्या गोष्टी nerve impulse मध्ये बदलून nervous system च्या त्या भागापर्यंत पोहचवल्या जातात, ज्या भागाला शरीराच्या त्या भागाच अर्थ माहित असतो. नवीन संशोधनाने याच गोष्टी सोप्या करुन सांगितल्या आहे.

काय आहे संशोधन?

डेविड यांनी आपल्या संशोधनादरम्यान, त्वचेवर मिर्चीचा वापर केला, ज्यामुळे त्वचेला त्रास होता. हे करताना त्यांना cDNA नावाचा जीन्स सापडला, जो आपल्या त्वचेजवळ ion channel (TRPV1) बनवत असतो, हे आपल्याला आतापर्यंत माहित नव्हतं. हे ion channel त्या तापमानाला कार्य करण्यास सुरुवात करतं, जेव्हा आपल्याला दुखणं सुरु होतं. यानंतर डेविड आणि आर्डर्नने TRPM8 चं संशोधन केलं, जे आपल्याला थंडीची जाणीव करुन देतात.

हे संशोधन महत्त्वाचं का?

संशोधनादरम्यान, आर्डर्न यांना कळालं की PIEZO1 आणि PIEZO2 हे 2 मॅकेनिकल सेंसर्स आहेत. त्यातील PIEZO2 हा स्पर्श ओळखण्यासाठी महत्वाचा असतो. या दोघांच्याही संशोधनाने स्पर्श जाणीव, उब, थंडी यासह अनेक गोष्टींबद्दलची गुपितं उघडी केली. याच गोष्टी आपली कुठल्याही गोष्टीला ओळखण्याची शक्ती, त्यात इंटरेस्ट घेण्याची क्षमता वाढवते. यामुळे आता आशा आहे की, या गोष्टी संबंधित आजारांवर मात करण्यासाठी या संशोधनाचा मोठा वापर होऊ शकतो.

हेही वाचा:

23000 वर्षांपूर्वी उत्तरी अमेरिकेत माणसं राहायची, आशिया ते अमेरिका स्थलांतर, पायांच्या ठशांनी इतिहास जिवंत केला!

इलेक्ट्रिक वाहनांचं चार्जिंग स्टेशन कसं सुरु करायचं? त्यासाठी खर्च किती? काय आहे Charging Station सुरु करण्याचे नियम? वाचा सविस्तर

 

KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.