
आपण केव्हा ना केव्हा स्वप्नं पाहिलेले असेल की जर आपल्याला कोणती तिजोरी मिळाली तर किती श्रीमंत होऊ…त्यातील खजिन्याने आपल्याला मग ऐशोरामात जगात येईल. परंतू काही वेळा पाहिलेले स्वप्न सत्यात देखील उतरलेले असते.
असेच काहीसे इंग्लंडच्या एका पिता-पुत्रासोबत झाले. त्यांना नदीत एक पुरातन तिजोरी मिळाली. या पिता-पुत्रांनी ही तिजोरी उघडण्याचा निर्णय घेतला. खूप मेहनतीने त्यांना ही तिजोरी उघडावी लागली. आतील ठेवलेल्या वस्तू जेव्हा त्यांनी पाहिल्या तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला काय होते या तिजोरीत पाहूयात…
इंग्लंडमध्ये राहणारे १५ वर्षांचे जॉर्ज टिंडले आपल्या ५२ वर्षांच्या वडीलांसोबत लिंकनशायर येथील ग्रँथम येथे राहातात. दोघांना मासे पकडण्याचा मोठा शौक आहे. याशिवाय त्यांना आणखी एक छंद आहे तो म्हणजे नदी लोहचुंबक टाकून रहस्यमयी वस्तू शोधण्याचा !
अलिकडे बापलेक विटहॅम नदीत मासे पकडायला गेले होते. तेव्हा त्यांनी स्वत:सोबत लोहचुंबक देखील नेले. असाच शोध घेत असताना त्याच्या लोहचुंबकाला एक तिजोरी चिकटली.
दोघांनाही समजत नव्हते की चुंबकाला तिजोरी कशी काय चिकटली. त्यानंतर दोघांना उत्सुकता लागली की अखेर या तिजोरीत असेल काय ? यानंतर दोघांनी तिजोरी उघडण्याचा निर्णय घेतला. परंतू तिजोरी खोलणे सोपे नव्हते. तरीही दोघांनी प्रयत्न करुन तिजोरी कशी तरी उघडलीच..
जशी तिजोरी उघडली तसे त्यातील सामान पाहून दोघांनाही आश्चर्य वाटले. ती तिजोरी पैशांनी भरलेली होती. त्यात सुमारे दीड लाख ऑस्ट्रेलियन चलन सापडले. इतके पैसे पाहून त्यांना धक्का बसला. तिजोरीत आणखी तपास केला असता त्यात एक बँक कार्ड आणि एक प्रमाणपत्र देखील सापडले.
ही कागदपत्रे वाचली तर त्यांना कळले ही रॉब एव्हरेट व्यापाऱ्याची तिजोरी आहे.त्यानंतर दोघांनी त्याचा शोध घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तिजोरीच्या मालकला शोधून काढले. त्याला तिजोरीतील त्याचे पैसे पाहून आश्चर्य वाटले. रॉब यांनी सांगितले की त्याने ही तिजोरी ऑफीसमध्ये ठेवली होती. परंतू साल २००० मध्ये त्याच्या कार्यालयातून ती चोरीला गेली. त्यानंतर तिचा काहीच थांगपत्ता लागला नाही. अखेर २२ वर्षांनी त्यांना त्यांची तिजोरी सापडली. रॉब या बापलेकाला म्हणाले की त्यांची एक वेल्थ मॅनेजमेंट कंपनी आहे. त्यात हवे तर तुम्ही जॉब करु शकता.