तो स्वतः चालत आला आणि तिरडीवर झोपला,नंतर अंतिम प्रवास सुरू झाला…का घडलं असं?
माणूस मेल्यानंतर अंत्ययात्रा काढली जाते, परंतू एका ठिकाणी एका जीवंत व्यक्तीची अंत्ययात्रा काढण्यात आली आहे. कुठे घडली अशी विचित्र घटना ?

माणूस मेल्यानंतर त्याची अंत्ययात्रा काढली जाते.त्यानंतर लोक त्याच्या तिरडीला खांदा देत ‘राम नाम सत्य है’ म्हणत त्याला स्मशानात नेतात. परंतू गया जिल्ह्यातील गुरारु प्रखंडातील कोंची गावात एक अनोखे दृश्य दिसले. जेथे वायू सेनेचे माजी जवान 74 वर्षीय मोहनलाल यांची जीवंत असतानाच अंतिम यात्रा काढण्यात आली. बँडबाजा आणि रामनाम सत्य हैच्या सुरात मोहनलाल फूलांनी सजवलेल्या तिरडीवर झोपून मुक्तीधामला पोहचले. त्याच्या अंत्ययात्रेत ‘चल उड जा रे पंछी, अब देश हुआ बेगाना’ ची धून वाजत होती. संपूर्ण मोहाल गंभीर झाला होता…
जीवंत असतानाच स्वत:ची अंत्ययात्रा काढल्याने मोहनलाल चर्चेत आले आहेत. त्यांच्या अंत्ययात्रेत शेकडो लोग सहभागी देखील झाले. ते तिरडीवरुन स्मशानात पोहचल्यानंतर उठले आणि त्यांच्याजागी त्यांचा पुतळ्यावर अग्निसंस्कार देण्यात आले. या वेळी अंत्यसंस्काराच्या सर्व रितीरिवाजाचे पालन करण्यात आले. चिता जळल्यानंतर राखेला नदीत प्रवाहीत करण्यात आले. यावेळी अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या लोकांसाठी सामुहिक भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
जीवंत व्यक्तीचा अंत्यसंस्कार का ?
या संदर्भात मोहनलाल यांनी सांगितले की व्यक्ती जेव्हा या जगाचा निरोप घेतो. तेव्हा तो पाहू शकत नाही की त्याच्या अंत्ययात्रेत कोण-कोण सहभागी झाले. मला पाहायचे होते की माझ्या अंत्ययात्रेत कोण-कोण सामील होतेय. मेल्यानंतर काही कळत नाही. मला हे दृश्य पाहायचे होते. मला जाणून घ्यायचे होते की मला किती मान सन्मान आणि स्नेह मिळतोय..
अनेक सामाजिक कार्य केले
मोहनलाल यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली आहे. पावसात अंत्यसंस्काराला होणारी अडचण पाहून त्यांनी आपल्या खर्चाने गावात सुविधा युक्त मुक्तीधाम उभारले. गावकऱ्यांनी सांगितले की मोहनलाल यांचे काम आमच्यासाठी प्रेरणास्रोत आहेत. मोहनलाल यांना दोन मुले असून एक डॉ.दीपक कुमार कोलकाता येथे स्थायिक आहेत. तर दुसरा मुलगा विश्व प्रकाश शाळेत शिक्षक आहेत. त्यांना एक मुलगी देखील असून ती धनबाद येथे राहाते. मोहनलाल यांची पत्नी जीवन ज्योती यांचे १४ वर्षांपूर्वी निधन झाले. मोहनलाल सर्व कामे त्यांच्या पेन्शनमधून मिळालेल्या पैशातून करतात.
