
बेडरुममध्ये छुपा कॅमेरा बसवून नवऱ्याने बायकोसोबत शारीरिक संबंध ठेवतानाचा व्हिडीओ गुपचूप शूट केला. हा व्हिडीओ त्याने मित्रांना पाठवला. बायकोला जेव्हा याबाबत कळाले तेव्हा तिने पोलिसात धाव घेतली. तिने नवऱ्याविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीमध्ये तिने सांगितले की, तिचे गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये लग्न झाले होते. आरोपी आधीच विवाहीत होता आणि हुंड्यासाठी त्याने हे दुसरे लग्न केले आहे. तसेच त्याने स्वत: कबूल केले की त्याचे 19 महिलांसोबत शारीरिक संबंध आहेत. महिलेच्या या तक्रारीनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे.
19 महिलांशी शारीरिक संबंध
बेंगळुरूमधील पुट्टेनहल्ली येथे हा प्रकार घडला आहे. पीडितेने तिच्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, आरोपी य्यद इनामुल त्याच्या दुसऱ्या बायकोला दररोज त्रास देत होता आणि १९ महिलांसोबत प्रेमसंबंध असल्याची बढाई मारत होता. घराच्या बेडरूममध्ये गुप्त कॅमेरा लावून बायकोसोबत लैंगिक कृत्ये रेकॉर्ड करणाऱ्या आरोपीने ते खाजगी व्हिडीओ दुबईत राहणाऱ्या त्याच्या मित्रांसोबत शेअर केल्याचा आरोप आहे. याशिवाय, त्याच्या पत्नीला परदेशात राहणाऱ्या त्याच्या काही मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा देखील गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
वाचा: अभिनेत्री तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती? ऐकून फुटेल घाम
आरोपीला मोठा हुंडाही मिळाला
लग्नाच्या वेळी आरोपीला हुंडा म्हणून यामाहा एरोक दुचाकी आणि 340 ग्रॅम सोन्याचे दागिने देण्यात आले होते. लग्नादरम्यान, आरोपीच्या मोठ्या बहिणीचा पती अमीन बेग (आरोपी-२) याने अनेक लोकांसमोर भांडण केले होते आणि केटरिंगमध्ये उशीर झाल्याबद्दल तक्रारदाराच्या कुटुंबातील सदस्यांना शिवीगाळ केली होती. 17-12-2024 रोजी, आरोपी सय्यदने कबूल केले की तो आधीच विवाहित आहे आणि त्याची दुसरी पत्नी आहेस. त्याने 19 महिलांशी संबंध असल्याचेही कबूल केले, असे एफआयआरमध्ये नमूद आहे.
आरोपी फरार
आरोपीने पीडितेला तिच्या पालकांना भेटण्यापासून रोखले होते आणि जर तिने भेट दिली तर घटस्फोट देण्याची धमकी दिली होती याचा उल्लेखही तक्रारीमध्ये करण्यात आला आहे. सध्या, पुट्टेनहल्ली पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवला आहे, परंतु आरोपी फरार आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.