VIDEO : महिलेची Cute डॉल्फिनसोबत मस्ती, व्हिडीओ पाहून उमटेल चेहऱ्यावर हसू…

आपण सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ पाहतो. यामध्ये अनेक प्राण्याते, पक्षांचे किंवा माशांचे क्युट असे व्हिडीओजही असतात. असाच एक व्हिडीओ तोही डॉल्फिन या सुंदर माशाचा सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे.

VIDEO : महिलेची Cute डॉल्फिनसोबत मस्ती, व्हिडीओ पाहून उमटेल चेहऱ्यावर हसू...

मुंबई : प्राणी आणि माणसांना एकमेकांची भाषा कळत नसेल तरी, त्यांच्यातील प्रेमाचं नात अनेक गोष्टी न बोलताही सांगून जातं. अनेक अशी उदाहरणं आहेत, ज्यामध्ये माणूस आणि प्राणी मग ते सारेच पक्षी, मासे असे सारेच. यांच्यामध्ये एक वेगळे नाते असते, या नात्यात एक निखळ असं प्रेम असतं. अशाच काही प्रेमळ प्राण्यांपैकी एक म्हणजे डॉल्फीन मासा (Dolphin). याच Cute माशासोबतचा एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ @yournaturegram या इन्स्टाग्राम पेजवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडीओत एक महिला पाण्याशेजारी बसली आहे. त्यावेळी तिच्या समोर एक डॉल्फिन मासा असून हा मासा आणि महिला यांची चांगली ओळख असल्याचं दिसून येत आहे. दोघेही एकमेंकासोबत मस्ती करत असून महिला तिला जेवण चारण्यासाठी आलेली असते. यावेळी डॉल्फिनच्या तोंडात दुसरा काही तर नाही ना? हे पाहण्यासाठी महिला तिच्या तोंडात हात घालून तपासते. त्यानंतर ती तिच्यासाठी आणलेलं खाणं तिला चारते.

प्रेमाच्या नात्यावर प्रेमळ कमेंट्स

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही कळेल, की या दोघींमध्ये अतिशय प्रेमाचं असं नातं आहे. हे नातं पाहूनच या व्हिडीओला नेटकरी अतिशय प्रेम देत असून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे. यावर अनेक कमेंट येत असून एका कमेंटमध्ये, ‘डॉल्फिन आणि या महिलेतील प्रेम खरचं कमालीचं आहे. असं म्हटलं आहे. तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे की, ‘किती हुशार प्राणी आहे.’ तर आणखी एकाने कमेंट मध्ये लिहिलं आहे की,’कोणत्याही जनावराला प्रेम करणं आणि त्याला खायला देणं हे फार पुण्याचं काम आहे.’

हे ही वाचा- 

Video: मधोमध स्पीडबोट, दोन्ही बाजूला पक्ष्यांचा थवा, नजरा पाहून नेटकरी म्हणाले, ‘दिवस कारणी लागला!’

VIDEO : मुलाने कबुतराला चमच्याने पाजलं पाणी, व्हिडीओ पाहून सुखावली नेटकऱ्यांची मनं!

VIDEO: कुत्रा आणि कबुतराची जोडी जमली, दोघांची मैत्री पाहून सर्वच चकीत

(A woman was seen playing with cute dolphin video went viral)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI