Video: मधोमध स्पीडबोट, दोन्ही बाजूला पक्ष्यांचा थवा, नजरा पाहून नेटकरी म्हणाले, ‘दिवस कारणी लागला!’

एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत, स्थलांतर करणारे पक्षी समुद्रातील स्पीड बोटीच्या दोन्ही बाजूला उडताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकजण अचंभित झाले आहेत.

Video: मधोमध स्पीडबोट, दोन्ही बाजूला पक्ष्यांचा थवा, नजरा पाहून नेटकरी म्हणाले, 'दिवस कारणी लागला!'
समुद्रात स्पीडबोट जात असताना तिच्या दोन्ही बाजूला पक्ष्यांचा थवा
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 12:44 PM

जगात दररोज काय घडेल सांगता येत नाही. जोपर्यंत मोबाईल आणि इंटरनेट नव्हतं, तोपर्यंत अशा काही भन्नाट गोष्टी घडल्या तरी, त्या फक्त सांगितल्या जायच्या, त्याच्या कहाण्या बनायच्या, या कहाण्यांवर काही लोक विश्वास ठेवायचे तर काही त्यांना भंपक म्हणायचे. मात्र, आता मोबाईल युगात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं चित्रिकरण करता येतं, त्यामुळं या भन्नाट गोष्टी जगासमोर येतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत, स्थलांतर करणारे पक्षी समुद्रातील स्पीड बोटीच्या दोन्ही बाजूला उडताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडीओ पाहून अनेकजण अचंभित झाले आहेत. कारण, पक्षी असंही करु शकतात, यावर त्यांचा विश्वास बसत नाही. ( A flock of birds on Both side of a speedboat at sea. Amazing view. Viral video )

जेव्हा तुम्ही स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांचे थवे पाहता, तेव्हा एक पक्षी थव्याच्या बरोबर मध्ये उडत असतो आणि इतर पक्षी त्याच्या पंखाला बरोबर त्रिकोण करुन उडताना दिसतात. याला V फॉरमेशन म्हणतात. मधला पक्षी हा सर्वात बलवान असतो, तर कमी बलवान आणि लहान पिलं ही थव्याच्या शेवटी उडतात. यामागे आहे विज्ञानाचा नियम. मधल्या पक्ष्याला सर्वाधिक हवेचा समना करावा लागतो. तो हवेला कापत जातो, बाकी त्रिकोणी आकारात उडणाऱ्या पक्षांना त्यामुळे हवेच्या तीव्र वेगाचा सामना करावा लागत नाही. परिणामी, शेकडो किलोमीटरचं अंतर हे पक्षी सहज पार करु शकतात. जेव्हा लढाऊ विमानं एकत्रित उडतात, तेव्हा या फॉरमेशनचा ते वापर करतात.

अगदी असंच काहीसं या व्हिडीओत होताना दिसत आहे. मात्र इथं पक्ष्यांनी एक चलाखी केली आहे. मधल्या पक्ष्याऐवजी त्यांनी बोटीलाच आधार बनवलं आहे. ही स्पीडबोट हवेला कापत जात आहे. आणि पक्षी बरोबर त्या बोटीच्या त्रिकोणात उडत आहेत. या बोटीत बसलेल्यांचं नशीब याहून चांगलं असूच शकत नाही. कारण, बोटीतील प्रवासी या पक्ष्यांचा व्हिडीओ काढत आहे, एकजण तर यातील एकाच्या मानेला हातही लावतो, मात्र हे पक्षी न घाबरता, आपल्या लक्ष्याच्या दिशेने उडत आहेत.

अवघ्या 24 सेकंदाचा हा व्हिडीओ IAS अविनाश शरण यांनी आपलं ट्विटर अकाऊंट @AwanishSharan वरुन शेअर केला आहे. या व्हिडीओला हजारो लोकांना पाहिलं आहे. शेकडो लाईक्स आणि शेअर्स झाले आहे. अनेकांना हा व्हिडीओ पाहून आपला दिवस कारणी लागल्याची कमेंट केली आहे. डोळ्यांना सुखावणार आणि तणाव दूर करणारा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आनंदी प्रतिक्रीया दिल्या आहेत. एकाने लिहलं आहे, हवा के साथ-साथ, घटा के संग संग तर एकाने लिहलं आहे, याला म्हणतात निसर्गाचं इंजिनिअरिंग.

हेही वाचा:

Video : लग्नात वधु-वराचा भन्नाट डान्स, लोक म्हणाले, ‘भावा, तुला आता बायकोच्याच तालावर नाचायचं आहे’

सुट्टीची मजा घ्यायला गेले, तब्बल 5 कोटींची लॉटरी जिंकून आले, एका सुट्टीने जोडप्याचं आयुष्य बदललं!

Video: दाजीसोबत मेव्हणीचं लफडं, बायकोने बहिणीला थेट जॉब इंटरव्यूव्हदरम्यानच धुतलं

 

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.