Video : लग्नात वधु-वराचा भन्नाट डान्स, लोक म्हणाले, ‘भावा, तुला आता बायकोच्याच तालावर नाचायचं आहे’

एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ज्यात वधू आणि वर सर्वांसमोर नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत

Video : लग्नात वधु-वराचा भन्नाट डान्स, लोक म्हणाले, 'भावा, तुला आता बायकोच्याच तालावर नाचायचं आहे'
वरातीत नवरा-नवरीचा भन्नाट डान्स

लग्नातील भन्नाट व्हिडीओ नेहमी व्हायरल होत असतात. हळद असो, मेहंदी असो, संगीत असो, किंवा मुलीला निरोप देतानाचे व्हिडीओ. असे व्हिडीओ नेटकऱ्यांना खूप आवडतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आला आहे. ज्यात वधू आणि वर सर्वांसमोर नाचताना दिसत आहेत. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळत आहेत. ( Bride-and-groom dance at your own wedding, viral video )

आपल्याकडे लग्न म्हणजे साधी गोष्ट नाही. मोठ मोठ्या वराती, गाणी त्यातील भन्नाट नृत्य आणि रुसणं-फुगणं. सगळं एकाच लग्नात सुरु राहतं. अनेकांची लग्न तर दुसऱ्याच्याच लग्नात जुळतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात नवरा नवरी चक्क आपल्याच लग्नात ठेका धरत आहे. वराती दरम्यान या दोघांनाही नृत्य करायला लावलं जातं, आधी हे नृत्य करण्यास नकार देतात, लाजतात मात्र नंतर जो ठेका धरतात, त्याने वऱ्हाड्यांच्या खिशातील मोबाईल निघतात, आणि ते व्हिडीओ बनवायला लागतात.

नवरा-नवरीचा हा डान्स सोशल मीडियावर लोकांना चांगलाच आवडतो आहे, यावर लोक अनेक मजेदार कमेंट्स करताना दिसताहेत. एका युजरनं लिहलंय, हा नवरा-नवरीचा डान्स पाहून वऱ्हाड्यांनाही लाज वाटली असेल तर दुसऱ्या एकाने कमेंट केली की भावाने लव्ह मॅरेज केलेलं दिसतं आहे. तर एकाने कमेंट केली आहे, भावा आता नाचून घे, उद्या तुला बायकोच्याच तालावर नाचायचं आहे.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘official_niranjan_kgm’ नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. ज्या व्हिडीओला बातमी तयार होण्यापर्यंत हजारो व्हिव्ह्ज मिळाले होते.

 

हेही वाचा:

सुट्टीची मजा घ्यायला गेले, तब्बल 5 कोटींची लॉटरी जिंकून आले, एका सुट्टीने जोडप्याचं आयुष्य बदललं!

Video: दाजीसोबत मेव्हणीचं लफडं, बायकोने बहिणीला थेट जॉब इंटरव्यूव्हदरम्यानच धुतलं

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI