AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: दाजीसोबत मेव्हणीचं लफडं, बायकोने बहिणीला थेट जॉब इंटरव्यूव्हदरम्यानच धुतलं

'साली आधी घरवाली' अशी हिंदी म्हण आहे, पण ही म्हण जेव्हा अस्तित्त्वात येते, तेव्हा काय होतं, हे या व्हिडीओत पाहाता येऊ शकतं.

Video: दाजीसोबत मेव्हणीचं लफडं, बायकोने बहिणीला थेट जॉब इंटरव्यूव्हदरम्यानच धुतलं
नोकरीच्या मुलाखतीदरम्यानच बहिणीने बहिणीला धुतलं
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 9:01 AM
Share

जगात प्रत्येक नात्यात काही ना काही वाद सुरुच असतात. मात्र, असं असतानाही माणूस नाती ही उत्तररित्या सांभाळतो. असं असलं तरी, कधीकधी हा वाद इतका वाढतो की नातं तुटायची वेळ येते. नेटवर एक असाच व्हिडीओ फिरतोय, ज्यामध्ये 2 सख्ख्या बहिणींमध्ये असा काही वाद झाला, की त्यांचं नातं तुटायची वेळ आली. या व्हिडीओत दिसतं आहे की, एक बहीण दुसऱ्या बहिणाला तेव्हा मारहाण करायला लागली, जेव्हा ती नोकरीसाठी इंटरव्यूव्ह देत होती. ( Elder sister beats younger sister during job interview over affair with husband viral video )

या व्हिडीओमध्ये पाहता येऊ शकतं की एक बहिण दुसऱ्या बहिणीला बेदम मारहाण करत आहे. तिने बहिणीचे केस पकडले आहेत, अगदी आपल्या गावाकडे महिलांची नळावर फ्रीस्टाईल हाणामारी होते , तशीच हाणामारी या दोघींमध्ये होत आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, एवढी मारहाण करण्याला कारण काय? तर याला कारण आहे मोठ्या बहिणीचा नवरा. त्याचं झालं असं की, जी मोठी बहिण लहान बहिणीला मारहाण करते आहे, तिच्या नवऱ्याचं आणि लहान बहिणीचं म्हणजेच दाजी आणि मेव्हणीचं अफेअरचा हा किस्सा. या दोघांचं चालू असल्याची कुणकुण या महिलेला लागली. आणि त्यानंतर काय, बहिण असली तरी तिला सोडणार थोडीच, म्हणून जिथं ही बहिण इंटरव्यूव्ह देत होती, तिथंच दुसरी बहिण पोहचली, आणि त्या ऑफिसमध्येच तिला मारहण सुरु केली.

इंटरनेटवर हा व्हिडीओ तेव्हा चर्चेत आला, जेव्हा @59dallas या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. या व्हिडीओखाली लिहण्यात आलं होतं की, जेव्हा मोठ्या बहिणीला कळालं की, तिचा नवरा लहान बहिणीसोबत झोपला आहे, तेव्हा तिचा पारा अनावर झाला. आणि ती नोकरीचा इंटरव्यूव्ह चालू असलेल्या रुममध्ये शिरली, तिला खुर्चीवरु खाली खेचलं आणि बेदम मारहाण सुरु केली.

हा व्हिडीओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत आहे, आणि युजरकडून यावर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरनं लिहलं, कशी बहिण आहे, आपल्याच बहिण्याच्या संसाराची राख रांगोळी कुणी करतं का? तर दुसऱ्या एका युजरनं लिहलं, की कुठल्याही महिलेला आपली बहिण आणि नवऱ्याबद्दल असं कळालं तर ती भडकणं सहाजिक आहे. काहींनी यामध्ये लिहलं की, दोष फक्त बहिणीचा नाही, नवऱ्याचाही आहेत, दरवेळी महिलेलाच टार्गेट का केलं जातं? सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.